CoronaMaharashtaUpdate : मोठी बातमी : लॉक डाऊन अटळ कि कडक निर्बंध ? दोन दिवसात नियमावली जाहीर : मुख्यमंत्री.

मुंबई । राज्यातील वाढता रोखण्यासाठी मुख्यमंत्री म्हणून मला जे करायचे आहे ते मी करणारच आहे . माझ्यावर कोण काय टीका करते याची मला परवा नाही. मला या राज्यातील जनतेचा जीव महत्वाचा आहे त्यामुळे मी लॉकडाऊनचा इशारा देत आहे, लोकांनी नियम पाळायला पाहिजेत. या संदर्भात बैठकांमधून चर्चा करून परिस्थितीचा आढावा घेऊन दोन दिवसात निर्णय घेईल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
राज्यातील जनतेशी संवाद साधण्यापूर्वी राज्यातील करोनाची स्थिती जाणून घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या वर्षा या निवासस्थानी आढावा बैठक घेतली. त्यानंतर ते रात्री ८.३० वाजता फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेसमोर आले. आपल्या संवादात त्यांनी विरोधकांचाही थोडक्यात समाचार घेतला. ते म्हणाले कि , मुख्यमंत्र्यांची विरोधकांना हात जोडून विनंती करतो जनतेच्या जीवाशी खेळू नका, राजकारण करू नका. आरोग्य सुविधा कधीही कमी पडू देणार नाही. करोना रोखायचा कसा, याबाबत विविध क्षेत्रातील जज्ज्ञ, पत्रकारांशी चर्चा करणार. कडक निर्बंध हे घालावेच लागणार, त्याबाबतची उद्या, परवा नियमावली जाहीर करणार.
मास्क न घालण्यात शौर्य काय ?
मी मास्क घालणार नाही, यात शौर्य आहे का? असा अप्रत्यक्षपणे राज ठाकरेंना टोला लगावला आणि आपल्यावरील आरोपाच्या हेडलाईन वाचून दाखवल्या नंतर ते म्हणाले उद्योगपतींना सांगतो की आरोग्यव्यवस्था वाढवतो, मला किमान डॉक्टर्स , नर्सेस महाराष्ट्राभर पाठवता येतील अशी व्यवस्था करा. लॉकडाउन खूप घातक आहे याची मला कल्पना आहे. पण आपण कात्रित सापडलो आहे. लॉकडाउन केला तर अर्थचक्र ठप्प होईल. सर्वपक्षीयांनी सरकारला सहकार्य करावे. विरोध जरूर करा. रस्त्यावरही जरूर या परंतु कोरोनाच्या विरोधात एकत्र या.
लसीकरणात महाराष्ट्र आघाडीवर
मुख्यमंत्री पुढे म्हणाले कि , ब्राझिलमध्ये विचित्र परिस्थिती आहे. रशियात सुद्धा लस आलीय. फ्रान्समध्ये परिस्थिती चिंताजनक आहे. तिथे तिसऱ्यांदा राष्ट्रीय लॉकडाउन होत आहे. लॉकडाउन करायचा का? अमेरिकेने सुद्धा ७ कलमी कार्यक्रम जाहीर केला आहे. राजकारण नको असे अमेरिकेतही म्हटले जात आहे. लस घेणे, चाचण्या वाढवणे हा उपाय नाही. मात्र रुग्णवाढ थांबवण्यासाठी कोणी उपाय सांगत नाही. दरदिवशी सहा लाख नागरिकांना लस देण्याची क्षमता महाराष्ट्राची आहे. पण केंद्राने तेवढा साठा पुरवायला हवा. काल एका दिवसात महाराष्ट्राने तीन लाख नागरिकांचे लसीकरण केले आहे. यात महाराष्ट्र देशात पहिले राज्य ठरले आहे.
दररोज अडीच लाख चाचण्या
विलगीकरण बेड २ लाख २० हजार आहेत. आताच ६२ टक्के बेड भरले गेले आहेत. आयसीयू बेड राज्यात २०,५१९ आहेत, त्यातील ४८ टक्के भरले आहेत. ऑक्सिजनचे बेड ६२ हजार २५ इतके आहेत.फिल्ड रुग्णालय उभारणारे महाराष्ट्र हे देशात पहिले राज्य ठरले आहे. आपण काहीही लपवणार नाही, राज्यातील एकही रुग्ण लपवला नाही आणि लपवणारही नाही. मला व्हिलन ठरवलं गेलं तरी देखील मी काम करतच राहणार याचा पुनरुच्चारही मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना उत्तर देताना केला. सध्या राज्यात करोना चाचण्या करणाऱ्या लॅबची संख्या ५०० वर पोहोचली आहे. आरटीपीसीआर चाचण्या अधिकाधिक करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे. या पुढील काळात दररोज अडीच लाख चाचण्या महाराष्ट्रात होणार असल्याचेही ते म्हणाले.
लग्न समारंभ, राजकीय कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर झाल्याने राज्यात करोना वाढला. करोनाच्या काळातही विरोधकांचा ‘शिमगा’ चालू असल्याचा विरोधकांना टोला लगावताना मुख्यमंत्री म्हणाले कि , यावर मी पुन्हा बोलेन. मधल्या काळात नियम पाळण्यात शिथीलता आली ती येऊ देऊ नका असेही ते म्हणाले.