CoronaMaharashtraUpdate : राज्यात ३५ हजार ७२६ नवे रुग्ण १६६ मृत्यू

मुंबई | राज्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढतच चालला आहे. आज राज्यात ३५ हजार ७२६ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तर, १६६ करोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळं राज्यातील मृत्यूदर २. ०२ टक्के इतका झाला आहे. दिवसभरात १४ हजार ५२३ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण २३ लाख १४ हजार ५७९ करोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या आता तीन लाखांवर गेली आहे. आजच्या आकडेवारीनुसार सध्या ३ लाख ०३ हजार ४७५ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,९१,९२,७५० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २६,७३,४६१ (१३.९३ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १४,८८,७०१ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १५,६४४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहे