AurangabadaNewsUpdate : सिद्दिकी मोहम्मद गालिब सिराजुद्दिन यांचे निधन

औरंगाबाद : नागसेन कॉलोनी येथील रहिवाशी रियल इस्टेट व्यावसायिक सिद्दिकी मोहम्मद गालिब सिराजुद्दिन तथा रहिमउद्दीन यांचे रविवारी पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले. ते ६५ वर्षांचे होते. त्यांची नमाज ए जनाझा रविवारी दुपारी पंचकुवा येथे अदा करून तेथील कब्रिस्तानात दफनविधी करण्यात आला. त्यांच्या पश्चात पत्नी, एक भाऊ, तीन बहिणी, दोन मुली, जावाई, एक मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे. ते सामाजिक कार्यकर्ता उमर सिद्दिकी यांचे वडील होत.