MarathawadaNewsUpdate :अॅट्राॅसिटीच्या गुन्ह्यात अंतरिम अटकपूर्व जामिन

औरंगाबाद – बिलोली नगरध्यक्षाच्या पतीवर दाखल झालेल्या अॅट्राॅसिटीच्या गुन्ह्यात खंडपीठाने अटकपूर्व अंतरिम जामिन मंजूर केला. बिलोलीच्या नगराध्यक्षा मैथीली कुलकर्णी यांचे पती संतोष कुलकर्णी यांच्यावर हा गुन्हा दाखल झाला आहे. भाजपाचे माधव मरीबा जाधव यांनी ११ फेब्रूवारी २१ मधे संतोष कुलकर्णी यांच्याविरुद्ध बिलोली शहरातील आंबेडकरनगर उध्व्दस्त करुन टाकण्याची धमकी देत जातीवाचक शिवीगाळ केली.असा आरोप केला होता. या प्रकरणी बिलोली पोलिस ठाण्यात संतोष कुलकर्णी यांच्या विरोधात अॅट्राॅसिटीचा गुन्हा दाखल झाला होता.
नांदेड जिल्हा न्यायालयाने या प्रकरणी कुलकर्णी यांचा अटकपूर्व जामिन फेटाळला होता. नांदेड न्यायालयाच्या निकालाला आव्हान देत संतोष कुलकर्णी यांनी खंडपीठात धाव घेतली. जेष्ठ विधीज्ञ राजेंद्र देशमुख यांनी या प्रकरणात कुलकर्णी यांची बाजू मांडली. गुन्हा दाखल झाला त्यावेळी तक्रारीमधे गुन्हा घडल्यापासून दोन दिवसांनतर तक्रार देण्यात आली होती.माधव जाधव यांच्या पत्नीने संतोष कुलकर्णी यांच्या विरोधात नगरपरिषदेची निवडणूक लढवली व त्यामधे त्यांचा पराभव झाला हौता. तक्रार दाखल करते वेळी जाधव यांच्या सोबंत भाजपा शहराध्यक्ष व नगरसेवक उपस्थित होते. त्यामुळे जाधव यांनी नियोजनबध्द रितीने अॅट्रासिटीची तक्रार दिल्यामुळे तसेच राजकिय षडयंत्राचा भाग या प्रकरणात आढळला.या युक्तीवादाचा न्यायमूर्ती विभा कनकंवडी यांनी निरीक्षण करुन संतोष कुलकर्णी यांचा अंतरिम अटकपूर्व जामिन मंजूर केला. या प्रकरणी पुढील सुनावणी १७एप्रिल रोजी ठेवण्यात आली आहे.तसेच दर शनिवारी संतोष कुलकर्णी यांनी सकाळी १०ते०२ यांनी बिलोली पोलिस ठाण्यात हजरी देण्यास सांगितले. वरील प्रकरणी याचिका कर्त्यातर्फे जेष्ठ विधीज्ञ अॅ.राजेंद्र देशमुख , अॅड.हर्षद पाडळकर तर सरकार तर्फे अॅड.एन.टी. भगत यांनी काम पाहिले