IndiaNewsUpdate : पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये सुरु आहे शांततेत मतदान

कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात सकाळी 12.00 वाजेपर्यंत बंगाल मध्ये 36 आणि आसाम मध्ये 26टक्के मतदान झाले असल्याचे वृत्त आहे. या दोन्हीही राज्यात सकाळी 7 वाजता मतदानाला प्रारंभ झाला. पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात 30 जागांसाठी कडक सुरक्षा व्यवस्थेत मतदान होत असून यामध्ये 73 लाखाहून अधिक मतदार 191 उमेदवारांचे भवितव्य ठरवणार आहेत. यापैकी अनेक जागा या नक्सलप्रभावी भागात आहेत. तर आसाम मध्ये विधानसभेच्या 47 जागांसाठी शनिवारी सकाळी मतदानाला सुरुवात झाली आहे. या पहिल्या टप्प्यात मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल, काही मंत्री आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या जगाचाही समावेश आहे.
पश्चिम बंगालमध्ये सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडेल. निवडणूक आयोगाने 7,061 परिसरात 10,288 मतदान केंद्रांची स्थापना केली आहे. आयोगाने या मतदान प्रक्रियेच्या सुरक्षेसाठी केंद्रीय राखीव दलाच्या 730 तुकड्या तैनात केल्या असून प्रत्येक तुकडीमध्ये 100 सुरक्षा कर्मचारी आहेत. सकाळी मतदान सुरु झाले तेंव्हा मोठ्या रांगा लागल्या होत्या. उन्हापासून बचाव करण्यासाठी मतदारांनी आपले मतदान केले . दरम्यान आसाममध्ये एकूण 81,09,815 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये 40,77,210 पुरुष आणि 40,32,481 स्त्रिया तर 124 थर्ड जेंडर मतदार आहेत. त्याचबरोबर ९ विदेशी मतदार आहेत. येथेही सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान होईल.