AurangabadNewsUpdate : मोबाईल चोर पोलिसांनी पाठलाग करुन पकडला

औरंगाबाद – ग्राफिक डिझाईनरचा मोबाईल व मोटरसायकलची चावी सहित पळवणारा मालेगावचा भामटा मुकुंदवाडी पोलिसांनी पाठलाग करुन पकडला.
इम्रानअली रशीद अली (२२) मेहवीनगर मालेगाव असे चोरट्याचे नाव आहे. सध्या तो हुसेन काॅलनीत राहतो. रामनगरमधील ग्राफिक डिझाईनर विशाल पोपळघट हा एपीआय काॅर्नरसमोर बुधवारी रात्री ९च्या सुमारास घरी जात असतांना आरोपी इम्रान हा त्याच्या जवळ येत बॅलेन्स संपल्यामुळे मोबाईल मागत होता तसेच पोपळघट यांना सिडको बसस्ठॅंडवर सोडण्याची विनंती करत होता.
दरम्यान पोपळघट यांनी त्याला सुमनांजली हाॅस्पिटल समोर सोडले असता. आरोपीने पोपळघट यांच्या मोबाईल सहित मोटरसारकलची चावी घेऊन पळ काढला. त्याचवेळी लोकमतकडून मुकुंदवाडी पोलिसांची जीप येत होती. पोपळघट यांनी ओरडून पोलिसांना घटना सांगितली. तो पर्यंत चोरटा इम्रान जळगावरोडकडे पळाला पोलिसांनी जीप ने पाठलाग सुरु केल्यावर तो थोड्या अंतरावर ठोकर लागून पडला. वरील प्रकरणी पोलिस निरीक्षक शरद इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली मुकुंदवाडी पोलिस करत आहेत.