AurangabadNewsUpdate : सुनेच्या खून प्रकरणी,आरोपी सासूची खंडपीठाकडून मुक्तता

औरंगाबाद – २२ वर्षापूर्वी सासूचे अनैतिक संबंध पाहणार्या सूनेचा खून करणार्यात आला. या प्रकरणी नांदेड जिल्हा न्यायालयाने दिलेली जन्मठेपेची शिक्षा न्या.रविंद्र घुगे आणि न्या. बी.यू. देबडवार यांच्या खंडपीठाने सबळ पुराव्या अभावी रद्द केली. १९९९साली नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील ही खुनाची घटना आहे. यातील प्रमुख आरोपी जनाबाई रामचंद्र कोंडामंगले हिचे नवर्याच्या मृत्यू नंतर परिसरातील एका हरिदास नावाच्या न्हाव्याशी अनैतिक संबंध होते. ही गोष्ट जनाबाई हिची सुन मीरा विठ्ठल कोंडामंगले हिने पाहिली होते. ३ आॅक्टोबर १९९९रोजी सकाळी ९वा गावातील रहिवासी सुनिता मातोरे यांनी जनाबाई व त्यांची सून मीरा यांना शेतात जातांना पाहिले. त्यानंतर सकाळी ११वा.मीरा मृतावस्थेत आढळली होती. धानोर्या चे पोलिसपाटील राम हिरामन कोमलवार यांनी लोहा पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारी वरुन गुन्हा दाखल झाला.
या प्रकरणात जनाबाई, मुलगा विठ्ठल आणि हरिदास यांना अटक करुन न्यायालयात लोहा पोलिसांनी हजर केले होते. नांदेड न्यायालयाने २००३ साली या प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावल्यापासून आरोपी जनाबाई जामिनावर बाहेर होती. या निर्णयाला आव्हान देत जनाबाईने खंडपीठात धाव घेतली. जनाबाई यांच्यावतीने अॅड.ए.एम.गायकवाड यांनी तर सरकार तर्फे अॅड.घयाळ यांनी काम पाहिले. खंडपीठाने या प्रकरणात एकूण ९साक्षीदार तपासले त्यामधे असे आढळले की, जनाबाईवर झालेले आरोप व पोलिसांना साक्षीदारांनी दिलेला जबाब यामधे बरीच तफावत होती.तसेच आरोपी जनाबाईच्या विरोधात सबळ पुरावे पोलिसांना तपासा दरम्यान गोळा न करता आल्यामुळे आरोपी जनाबाई कोंडामंगले हिची निर्दोष मुक्तता झाली.