CoronaMaharashtraUpdate : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाचे नवे निर्बंध

मुंबई: कोरोनाचा वाढता संसर्ग थांबविण्यासाठी राज्य सरकारकडून कोविड बाबत नव्याने आदेश जारी करण्यात आले असून त्यात अनेक निर्बंध पुन्हा एकदा लावण्यात आले आहेत. या आदेशानुसार सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांच्या विभाग व कार्यालय प्रमुखांनी कोविड परिस्थिती लक्षात घेऊन त्यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांची उपस्थिती किती ठेवायची ते निश्चित करावे असे या आदेशात म्हटले आहे. तसेच, नाट्यगृहे व सभागृहातील उपस्थिती देखील ५० टक्के असावी तसेच त्यांचा उपयोग धार्मिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक मेळावे व सभा अशा इतर कारणांसाठी करता येणार नाही असेही या आदेशात नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान राज्यात कोरोनाचा धोका वाढला आहे. काल गुरुवारी राज्यात विक्रमी संख्येने २५ हजार नवीन रुग्ण सापडले होते. त्यामुळे याआधी सरकारने हॉटेल व मंगल कार्यालयांवर निर्बंध लावण्यात आले होते. त्यानंतर आज सरकारने नव्याने नियमावली जारी करत खासगी कार्यालयांवर निर्बंध घालण्यात आले आहेत. राज्यातील सर्व खासगी कार्यालये व आस्थापनांमध्ये ( आरोग्य व इतर अत्यावश्यक सेवा व आस्थापना तसेच मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्र वगळून) ५० टक्के कर्मचारी उपस्थिती ठेवण्याबाबत नियमावली जारी केली आहे.
Number of #COVID19 patients had increased in Sept 2020 as well. But today we have vaccine as a shield. Citizens should get vaccinated. Rules should be followed so that there's no infection. But if rules aren't followed, strict measures will be taken in near future: Maharashtra CM pic.twitter.com/B0fgmbUdqC
— ANI (@ANI) March 19, 2021