MumbaiNewsUpdate : तपासात अडथळा नको म्हणून बदल्या : गृहमंत्री

मुंबई । सचिन वाझे प्रकरणी वादात सापडलेले मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची अखेर बदली करण्यात आली असून त्यांच्या जागेवर हेमंत नगराळे यांची मुंबईचे नवे पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर, परमबीर सिंग यांची गृहरक्षक दलामध्ये बदली करण्यात आली आहे.
या पार्श्वभूमीवर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान “एनआयए आणि एटीएस सचिन वाझे प्रकरणाचा तपास योग्य प्रकारे करत आहेत, त्यानुसार कारवाई केली जाईल. परमबीर सिंग यांची मुंबई पोलीस आयुक्तपदावरून बदली करण्यात आली आहे, जेणेकरून कोणत्याही अडथळ्याशिवाय तपास होईल.” असं अनिल देशमुख यांनी ट्विट केले आहे.
सचिन वाझे प्रकरणात गेल्या काही दिवसांपासून परमबीर सिंग यांच्यावर टीका केली जात होती. त्यांच्या बदलीची चर्चा देखील सुरू होती. अखेर राज्य सरकारने त्यांच्या बदलीचे आदेश काढले. तर, सचिन वाझे प्रकरणाचा तपास एनआयए व एटीएस करत आहे.