MumbaiNewsUpdate : निलंबित एपीआय वाझे चौकशी : गाड्यांची लागली रांग !!

मुंबई, । सचिन वाझे प्रकरणाचा तपास एनआयएकडे दिल्यानंतर आतापर्यंत नवनवी माहिती समोर आली आहे. या प्रकरणात आतापर्यंत तब्बल 5 गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. या गाड्यांच्या माध्यमातून एनआयए आता कोणती माहिती समोर आणणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे. आतापर्यंत एनआयएने स्कॉर्पिओ, इनोव्हा, प्रॅडो आणि एक मर्सिडीज गाडी जप्त केली असून गुरुवारी दुपारी दुसरी मर्सिडीज जप्त करून ती कार्यालयात आणण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. पहिली मर्सिडीज सीएसएमटीजवळील एका पार्किंगमधून ताब्यात घेण्यात आली होती, त्यानंतर आणखी एक मर्सिडीज एनआयएच्या हाती लागली आहे.
पहिल्या मर्सिडीजमध्ये केरोसीन, 5 लाखांची रोख, पैसे मोजण्याचं यंत्र, शर्ट सापडले होते. दुसऱ्या मर्सिडीजमधील वस्तुंमुळे आणखी खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मागच्या मर्सिडीजमध्ये केरोसीन, 5लाख रुपये रोख, एक पैसे मोजण्याचे मशीन आणि शर्ट सापडले होते. आता जप्त केलेली दुसरी मर्सिडीज कोण वापरत होते?, वाझेच वापरत होते का? असे प्रश्न आहेत. आतापर्यंत NIA ने सचिन वाझे प्रकरणात 5 गाड्या जप्त केल्या असून एक ट्रॅडो गाडी ही वाझेंच्या कंपाऊंडमधून ताब्यात घेतली आहे, अशी माहिती समोर आली आहे. ही गाडी अद्याप NIA च्या कार्यालयात आणण्यात आलेली नाही. याशिवाय एका स्कोडा गाडीचाही शोध घेतला जात असून आतापर्यंत 5 गाड्या NIA च्या हाती लागल्या आहेत.