CoronaMaharashtraNewsUpdate : गेल्या २४ तासात १५ हजाराहून अधिक कोरोनाबाधित , ४८ रुग्णांचा मृत्यू

मुंबई : राज्यातील कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत असून राज्यात लागू करण्यात येत असलेले कडक निर्बंध तर अनेक जिल्ह्यात रात्रीचे कर्फ्यू आणि लॉकडाऊन पाळूनही गेल्या २४ तासात राज्यात १५ हजार ५१ करोनाबाधित वाढले असून, ४८ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे राज्यातील मृत्यूदर २.२७ टक्के एवढा झाला आहे. आजपर्यंत राज्यात ५२ हजार ९०९ रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. तर सध्या राज्यात एकूण १,३०,५४७ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
दरम्यान, आज १०,६७१ रुग्ण कोरोनातून बरे झाले. तर, राज्यात आजपर्यंत एकूण २१,४४,७४३ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९२.०७ टक्के एवढे झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,७६,०९,२४८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २३,२९,४६४ (१३.२३ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ६,२३,१२१ व्यक्ती गृहविलगीकरणामध्ये आहेत, तर ६ हजार ११४ व्यक्ती संस्थात्मक विलगीकरणात आहेत.
राज्यात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असताना दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कठोर निर्णय घेण्यासंदर्भात सूतोवाच केले होते. तर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही निर्बंध कठोर करण्यासंदर्भात भूमिका मांडताना “वाढत्या रुग्णसंख्येवर लॉकडाऊन हा पर्याय नसून निर्बंध अधिक कठोर केले जातील. पण राज्यातल्या जनतेने नियमांचे पालन करून सहकार्य करावे ”, असे आवाहन राजेश टोपेंनी राज्यातल्या जनतेला केले आहे. त्यामुळे राज्याच्या काही भागांमध्ये सध्या अंशत: लॉकडाऊनची परिस्थिती असताना संपूर्ण राज्यासाठीच नवीन प्रकारचे निर्बंध घातले आहेत.
Maharashtra reports 15,051 new COVID-19 cases, 10,671 discharges, and 48 deaths in the last 24 hours
Total cases: 23,29,464
Total discharges: 21,44,743
Active cases: 1,30,547
Death toll: 52,909 pic.twitter.com/ToKb4hysh5— ANI (@ANI) March 15, 2021