AurangabadNewsUpdate : महिला दिना निमित्त ७० महिलांनी दौलताबाद पोलीस ठाण्याला दिली भेट

पो स्टे दौलताबाद येथे जागतिक महिला दिना निमित्त पो स्टे हद्दीतील महिलांना बोलावून त्याच्या बरोबर चर्चा करून त्यांना पोलीस निरीक्षक राजश्री आडे यांनी मार्गदर्शन केले. ज्या वयो वृध्द महिला आहेत, ज्यांनी उभ्या आयुष्यात कधीही पोलिस स्टेशन पाहिले नाही मात्र पोलिस स्टेशन असते कसे हे त्यांना पहायची इच्छा होती,अशा देवकाबई किशन मनोरे वय ७५ वर्षे रा. वांजारवडी, आबेदा मोहम्मद निसार वय ७५ वर्षे रा. अब्दिमंदी यांना पोलिस स्टेशनच्या कामकाजाची माहिती दिली. तसेच देश सेवेत भारतीय सैन्य दलात कार्यरत असलेल्या योगेश आढाव यांच्या आई सुनीता आढाव व पत्नी पूजा आढाव यांचा विशेष सत्कार केला. यावेळी पो स्टे हद्दीतील जवळपास ७० महिलांना पो स्टे ला भेट दिली. व त्यांचे ईच्छेखातर त्यांना रायफल व इतर शस्त्र दाखवण्यात आली