IndiaNewsUpdate : केंद्राच्या धाड सत्रावरून राहुल गांधी यांची टीका

नवी दिल्ली : दिग्दर्शक अनुराग कश्यप, विकास बेहेल आणि अभिनेत्री तापसी पन्नूच्या घरावर आणि मालमत्तांवर प्राप्तिकर विभागानं छापे टाकले आहेत. याच दरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. म्हणींचा वापर करत मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे.
राहुल गांधी यांनी आयकर विभाग , सक्तवसुली संचालनालय आणि केंद्रीय तपास यंत्रणा याबाबत ‘उंगलियों पर नचाना’ या म्हणीचा वापर करत केंद्र सरकार यांना आपल्या बोटांवर नाचवत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. राहुल गांधी यांनी माध्यमांबाबतही एक म्हण लिहिली आहे. माध्यमं ही पंतप्रधान मोदी यांचे मित्र असल्याचं म्हटलं आहे. तसेच ‘खिसियानी बिल्ली खंबा नोचे’ या म्हणीचा वापर करुन सरकार शेतकरी नेते आणि त्यांच्या समर्थकांवर छापे टाकत असल्याचं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.