AurangabadNewsUpdate : बेरोजगार तरुणाने घेतली फाशी

औरंगाबाद – बेरोजगार असलेल्या तरुणाने आई वडलांशी होणार्या सततच्या भांडणाला कंटाळून फाशी घेतली.या प्रकरणी पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
विजय देविदास सोनवणे (२२) गुरुदत्तनगर गारखेडा असे आत्महत्या करणार्या तरुणाचे नाव आहे. मयत हा बेरोजगार असल्यामुळे सतत आई वडलांशी त्याचे खटके उडंत होते. अशी माहिती परिसरातील नागरिकांनी पोलिसांना दिली. या प्रकरणी पुढील तपास एपीआय घन्नशाम सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी जाधव करंत आहेत.