AurangabadNewsUpdate : आता पोलिस ठाण्याच्या प्रत्येक दालनात सीसीटिव्ही : डॉ. निखील गुप्ता

औरंगाबाद – सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर शहरातील सर्व पोलिस ठाण्यामधील प्रत्येक दालनात सीसी. टि.व्ही. बसवण्याचे काम प्रगतीपथावर आहे.अशी माहिती पोलिसआयुक्त डाॅ.निखील गुप्ता यांनी दिली.
डिसेंबर २०मधे सर्वोच्च न्यायालयाने देशातील सर्व पोलिस ठाण्यांच्या प्रत्येक दालनात सी.सी. टि.व्ही. बसवण्याचे आदेश दिलेले आहेत.फेब्रू २०२१पर्यंत देशात या आदेशाची कुठेही अंमलबजावणी झाली नाही.शेवटी १ मार्च २०२१ला न्या.रोहिंटन फली नरीमन, न्या.बी.आर.गवई आणि न्या. ॠषीकेश राॅय यांच्या त्रिसदस्यिय पिठाने नव्याने जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे की,
देशातील प्रत्येक राज्याला पोलिस ठाण्यांमधील सी.सी.टि.व्ही. बसवण्याच्या प्रक्रिये संदर्भात शपथपत्र दाखल करुन कालावधीचा उल्लेख करावा.त्यानुसार महाराष्र्टातून अॅड राहूल चिटणीस गृहमंत्रालयाशी संपर्क साधून शपथपत्र दाखल करंत आहेत..