AurangabadNewsUpdate : जागतिक बँंक प्रकल्पाने पोलिसांनाच लावले कामाला…

औरंगाबाद – शहरात बीडबायपास या रस्त्याची जागतिक बँंक प्रकल्पाने जबाबदाव घेतली आहे. महानूभव आश्रम ते झाल्टा फाटा हा शहरातील रस्ता जागतिक बँंक प्रकल्प शहर वाहतूक पोलिसांच्या मदतीने देख रेख करत असते या देखरेखीमधे बीड बायपास वर अंदाजे १० डिव्हायडर येतात. गेल्या दोन आठवड्यात बीड बायपासवरील निशांत पार्क समोर दोन अपघात झाले. या नंतर परिसरातील नागरिकांनी वाहतूक शाखेला बीड बायपास वरील डिव्हायडर वर पांढरे पट्टे मारले नसल्यामुळे अपघात होतात या बद्दल तक्रारी केल्या. दरम्यान जागतिक बँंक प्रकल्प कार्यालयाकडे वाहतूक शाखेने या पांढर्या पट्ट्यांसाठी पत्र व्यवहार केला. पण प्रकल्प कार्यालय या पत्रांकडे दुर्लक्ष करत असल्याचे लक्षात येताच वाहतूक शाखेच्या अधिकार्यांनी स्वता:पांढरा रंग खरेदी करुन बीड बायपासवरीव डिव्हायडर रंगवले. जागतिक बँंक प्रकल्प कार्यालयाच्या या हलगर्जीपणाची पोलिसआयुक्ता लयातील वरिष्ठ अधिकार्यांनी गंभीर दखल घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली