MaharashtraNewsUpdate : शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांची भेट का घेतली ?

मुंबई: राज्यात पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामुळे प्रकरणामुळे चर्चेत चर्चेत आलेले आलेले वनमंत्री संजय राठोड अचानक अचानक जोरदार शक्तिप्रदर्शन करीत करीत पोहोरादेवीत पोहोचल्याने पोहोचल्याने पुन्हा पुन्हा प्रकाश प्रकाश झोतात झोतात आल्यानंतर आल्यानंतर मुख्यमंत्री मुख्यमंत्री उद्धव उद्धव ठाकरे ठाकरे यांनी यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली . दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज सायंकाळी वर्षा निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीत पूजा चव्हाण प्रकरण व पोहरादेवीत आज जे घडले त्याबाबत चर्चा झाल्याचे वृत्त आहे. त्यामुळे संजय राठोड यांच्या अडचणींत अधिकच भर पडण्याची चिन्हे आहेत.
गेल्या काही दिवसांपासून पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणानंतर ऑडिओ क्लिपच्या आधारावर संजय राठोड यांच्यावर भाजपकडून थेट आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने चौकशी सुरू आहे. दरम्यान, गेल्या १४ दिवसांपासून नॉट रिचेबल असलेले संजय राठोड आज बंजारा समाजाची काशी अशी ओळख असलेल्या पोहरादेवी गडावर दाखल झाले. तिथे त्यांनी दर्शन घेतले व माध्यमांशीही संवाद साधला. यावेळी राठोड समर्थक व बंजारा समाज बांधवांची मोठी गर्दी उसळली होती. गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमारही करावा लागला. पोहरादेवी धर्मपीठ वाशीम जिल्ह्यात असून या जिल्ह्यात करोना संसर्ग वाढत असताना हे शक्तिप्रदर्शन एका मंत्र्यानेच केल्याने राठोड आणखी गोत्यात आले आहेत. मुख्य म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी राज्यातील जनतेशी संवाद साधताना सामाजिक, राजकीय आणि धार्मिक कार्यक्रमांना मनाई करण्यात येत असल्याचे बजावून सांगितले होते. त्यानंतरही शिवसेनेच्याच एका मंत्र्याने गर्दी जमा करून नियम मोडल्याने हे प्रकरण अधिकच गंभीर झाले आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी सायंकाळी मुख्यमंत्र्यांची घेतलेली भेट महत्त्वाची ठरली आहे.
दरम्यान वृत्त वाहिन्यांनी दिलेल्या वृत्तानुसार , संजय राठोड यांच्याबाबत एकूणच शरद पवार यांनी आपली नाराजी मुख्यमंत्र्यांकडे बोलून दाखवल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. संजय राठोड यांच्यावर जे आरोप होत आहेत व आज पोहरादेवी येथे जो प्रकार घडला ते पाहता सरकार आणि त्यासोबतच मुख्यमंत्र्यांच्या प्रतिमेला फटका बसत आहे. त्यामुळेच तपास पूर्ण होईपर्यंत राठोड यांनीच पदापासून दूर राहावं, अशी अपेक्षा पवारांनी व्यक्त केल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळेच राठोड यांच्यावर कारवाई करण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्यावर दबाव वाढला असून राठोड यांचा राजीनामा घेतला जाण्याची शक्यता पुन्हा एकदा बळावली आहे.