UttarPradeshNewsUpdate : आंदोलक शेतकरी आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी

उत्तर प्रदेशच्या मुझफ्फरनगर जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांमध्ये सोमवारी हिंसक चकमक झाली. या हिंसाचारात अनेक जण जखमी झाले आहेत. दोन्ही बाजूकडून जोरदार घोषणाबाजी सुरु आहे. राष्ट्रीय लोक दलचे नेते जयंत चौधरी यांनी या हिंसक चकमकीबद्दल टि्वट करुन माहिती दिली.
ही घटना शाहपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोराम गावात घडली. सोराम गावात भाजपा नेते आणि शेतकऱ्यांमध्ये हा हिंसक संघर्ष झाला. अनेक जण यामध्ये जखमी झाले आहेत. शेतकऱ्यांच्या हिताची भूमिका मांडत नसाल, तर निदान तुमचे वर्तन तरी चांगले ठेवा. शेतकऱ्यांचा आदर करा. सरकारी प्रतिनिधी दडपशाही पद्धतीने, गुंडागर्दी करून शेतकऱ्यांना नव्या कृषी कायद्याचे फायदे समजावून सांगत असतील, तर ते गावकरी सहन करतील का? असे टि्वटमध्ये म्हटले आहे.
सोरम गाँव में बीजेपी नेताओं और किसानों के बीच संघर्ष, कई लोग घायल! किसान के पक्ष में बात नहीं होती तो कम से कम, व्यवहार तो अच्छा रखो। किसान की इज़्ज़त तो करो! इब कानूनों के फायदे बताने जा रहे सरकार के नुमाइंदों की गुंडागर्दी बर्दाश्त करेंगे गाँववाले?#मुजफ्फरनगर pic.twitter.com/X21oP7iTgP
— Jayant Singh (@jayantrld) February 22, 2021
गेल्या अनेक दिवसांपासून शेतकरी कृषि कायद्याविरोधात आंदोलन करत आहेत. या आंदोलनाचे लोण पश्चिम उत्तर प्रदेशपर्यंत पसरल्याने भाजपाची चिंता वाढली आहे. कारण लोकसभा निवडणुकीत ४० जागांवर भाजपाला याचा फटका बसू शकतो. त्यामुळे भाजपाच्या केंद्रीय पातळीवरुन, शेतकऱ्यांचा रोष शांत करण्याचे स्थानिक नेत्यांना सूचना देण्यात आल्या आहेत.