AurangabadNewsUpdate : पोलीस कर्मचारी मेटे यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने

औरंगाबाद- बेगमपुरा पोलिस ठाण्यातील कर्मचारी भास्कर मेटे यांचा मृत्यू हृदयविकाराच्या धक्क्याने झाला असल्याचा अहवाल घाटी रुग्णालयातील डॉक्टरांनी पोलिसप्रशासनाला दिला आहे.
भास्कर मेटे यांनी कोरोनाची लस घेतल्यानंतर काही दिवसाथच त्यांचा मृत्यू झाला. हा मृत्यू लसीकरणामुळे झाला असा संशय मेटे यांच्या निकटवर्तीयांनी व्यक्त केल्यावर पोलिसांनी घाटीतील डाँक्टरांकडून मेटे यांच्या मृत्यूचा अहवाल मागवला होता. तसेच त्यांचे नव्याने स्वँब टेस्टही घेण्यात आले हौते. कोरानाची चाचणी निगेटिव्ह आल्याबलोबरंच मेटे यांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट झाल्याचे पोलिसांनी सांगितले