#LIVE | MahanayakCurrentNewsUpdate : जाणून घ्या दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाचे घडामोडी

केंव्हाही आणि कुठेही फक्त एका क्लिक वर जाणून घ्या दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाचे घडामोडी.
राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवारांना दिलासा; हसन मुश्रीफांसह 65 संचालकांना दिलासा सहकार विभागाच्या अहवालात क्लीन चिट.
नागपुरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या संग्रहालयासाठी केंद्राकडून 4.25 कोटींचा निधी वितरित
राज्यातील कृषी ग्राहकांसाठी मोठा दिलासा, ‘थकबाकीची 66% रक्कम माफ’ ऊर्जामंत्री नितीन राऊतांची नागपुरात घोषणा
#RainUpdate
19 फेब्रुवारीलाही मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मध्यम आणि मुसळधार पाऊस पडेल, असा इशारा पुणे वेधशाळेनं दिलाय.
रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, नाशिक, सातारा, सोलापूर, बीड, औरंगाबाद, परभणी, भंडारा, यवतमाळ, वाशिम, गोंदिया, अमरावती, बुलडाणा जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली.
नवी मुंबईत मुसळधार पावसाला सुरुवात 20 मिनिटांपासून पनवेल, खारघरमध्ये पाऊस सुरू आहे, सीबीडी बेलापूर परिसरातही पावसाची हजेरी आज. आज दुपारपासूनच तापमानात वाढ होती. काही ठिकाणी पावसानंतर आता गारठा पडला आहे.
सातारा – खटावमध्ये गारपीट, जोरदार पाऊस
कोल्हापूर – भुदरगड तालुक्यात जोरदार गारपीट
नाशिक जिल्ह्यात अवकाळी पावसाचे आगमन, अनेक भागात पावसासह गारपिटीला सुरुवात. द्राक्ष आणि कांदा उत्पादक शेतकरी संकटात. नाशिक जिल्ह्यात पावसाने पिकांचे मोठे नुकसान.
नांदेड – जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाची हजेरी, शहरातही पाऊस सुरू, पावसामुळे शहरात अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित. दरम्यान, माहूरच्या चिंचवड गावातील घटना अवकाळी पावसाने घेतला शेतकऱ्याचा बळी वीज पडल्याने 62 वर्षांच्या आनंद चव्हाणांचा मृत्यू
बीड – जिल्ह्यात अवकाळी पाऊसमुळे गहू, हरभरा, ज्वारी पिकं धोक्यात,
नांदेड – जिल्ह्यात अवकाळी पाऊसमुळे रब्बी हंगामातील पिकांचं नुकसान
सांगली – जिल्ह्यात अवकाळी पाऊसमुळे द्राक्ष बागांचं मोठं नुकसान
अकोला – बार्शीटाकळीत जोरदार पाऊसमुळे परिसरात तुरळक गारपीट, पिकांना धोका
सोलापूर – जिल्ह्यात पावसाची रिमझिम द्राक्ष, ज्वारी उत्पादक शेतकरी चिंतेत
#CoronaUpdate
सावधान! राज्यात कोरोनाची पुन्हा होतेय वाढ, दिवसभरात 2,543 रुग्ण बरे होऊन घरी ; राज्यातील रुग्ण बरं होण्याचे प्रमाण 95.5% ; राज्यात दिवसभरात 5,427 नवीन रुग्ण ; राज्यात दिवसभरात 38 रुग्णांचा मृत्यू ; राज्यात सध्या अॅक्टिव्ह रुग्ण 40,858
औरंगाबाद – पाचवी ते 10 वीपर्यंतची मुलं शाळेत आली नाही तरी चालेल, ज्यांना शाळेत यायचे त्यांनी शाळेत जावं, वाढत्या कोरोनाबाबत औरंगाबाद मनपा आयुक्तांचे पाऊल.
‘अमरावती,अकोला,यवतमाळची परिस्थिती गंभीर’ असल्याने ‘प्रादुर्भाव भागात कंटेन्मेंट झोन जाहीर करा’, ‘तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घ्या’ मुख्य सचिवांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश
पुण्यात दिवसभरात 465 रुग्णांची वाढ झाली, नवी मुंबईत रुग्णांचा आकडा शंभरी पार ; अमरावती जिल्ह्यात आजही कोरोनाचा स्फोट ;अमरावतीत दिवसभरात 597 नवीन रुग्ण
अमरावती – कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने जिल्ह्यात रविवारी लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली, रविवारी अमरावती जिल्हा बंद, केवळ अत्यावश्यक सेवा सुरू राहणार, जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांची माहिती
18.02.2021 | 4.47 : ‘रेल रोको’ आंदोलन शांततेत पार पडले. काही भागात काही गाड्या थांबविण्यात आल्या परंतु आता रेल्वेचे कामकाज सुरळीत आहेः भारतीय रेल्वे
'Rail roko' agitation passed off without any untoward incident. There was negligible or minimal impact on running of the trains across the country. Train movement in all zones is normal now. Few trains were stopped in some areas but now train operation is normal: Indian Railways
— ANI (@ANI) February 18, 2021
18.02.2021 | 3.49 : मोदीनगर: भारतीय किसान युनियनच्या सदस्यांनी पोलिस कर्मचार्यांवर फुलांचा वर्षाव करून त्यांना मिठाई देणून आंदोलनाला पाठिंबा दिला. दरम्यान, पोलिसांनी आंदोलकांना आंदोलन संपविण्याचे आवाहन केले
मुंबईत कोरोनाबाधित, होम क्वॉरन्टीन व्यक्ती फिरताना आढळल्यास थेट एफआरआर दाखल करणार, लोकलच्या तीनही मार्गांवर 300 मार्शल तैनात करणार, मुंबईत लग्न कार्यालये, क्लब, रेस्टॉरंट्सवर धाडसत्र सुरु करणार, मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिका प्रशासनाचा मेगाप्लॅन
वर्धा : वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश , 5 पेक्षा जास्त व्यक्तींनी एकत्र न येण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश , लग्न व इतर कार्यक्रमासाठी 50 व्यक्तींचे बंधन , औषधी दुकाने व रुग्णालये सोडून इतर दुकाने व बाजारपेठा सायंकाळी 7 पर्यंत सुरू
अकोला, अमरावती आणि यवतमाळ या शहरात लॉकडाऊन होण्याची शक्यता, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची चर्चा
दिल्लीच्या सीमेवर 100 दिवसांहून अधिक दिवसांपासून शेतकरी कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी आंदोलन करत आहे. या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाब आणि उत्तराखंडमधील शेतकऱ्यांचा समावेश आहे. शतकऱ्यांने आंदोलन तीव्र केले असून आज देशव्यापी चार तासांचे ‘रेल रोको’ आंदोलन करण्यात आले आहे.
18.02.2021 | 2.30 : हरियाणा: कृषी कायद्याविरूद्ध देशव्यापी ‘रेल रोको’ आंदोलनाला अंबाला येथील शेतकऱ्यांचा पाठिंबा.
18.02.2021 | 12.54 : हरियाणा: पलवलमध्ये ‘रेल्वे रोको’ आंदोलन.
Haryana: Farmers block railway tracks in Palwal as a part of their nationwide 'rail roko' agitation against Farm Laws. Security personnel also present. pic.twitter.com/npImeT7O6S
— ANI (@ANI) February 18, 2021
18.02.2021 | 12.30 : जम्मू-काश्मीरः युनायटेड-किसन फ्रंटच्या तत्वाखाली शेतकरी जम्मूच्या चन्नी हिमत भागात रेल्वे रुळावर प्रात्यक्षिक दाखवत 4 तास देशव्यापी ‘रेल रोको’ आंदोलनात सहभागी
18.02.2021 | 11.30 : बिहार: जन अधिकार पार्टी (डेमोक्रॅटिक) स्टेजचे कामगार पाटणा जंक्शन रेल्वे स्टेशनवर, ‘रेल रोको’ आंदोलन.
18.02.2021 | 10.25: गाझियाबाद: आज गावातून 4 तास देशव्यापी ‘रेल्वे रोको’ आंदोलन आवाहनाच्या पार्श्वभूमीवर गाझियाबाद जंक्शन येथे सुरक्षा तैनात.
18.02.2021 | 09.45: लखनऊ: विधानसभेचे बजेट अधिवेशन आजपासून सुरू होत असल्याने. समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी व नेत्यांनी राज्य सरकारच्या विरोधात राज्य विधानसभेबाहेर आंदोलन केले.
18.02.2021 | 09.39 : हरियाणा: आज देशव्यापी ‘रेल रोको’ या आवाहनाच्या पार्श्वभूमीवर पलवल रेल्वे स्थानकावर पोलिस कर्मचारी तैनात.
#FarmerProtest : ‘रेल रोको’; लासूर रेल्वे स्थानकावर मोठा अनर्थ टळला
#FarmerProtest : ‘रेल रोको’; लासूर रेल्वे स्थानकावर मोठा अनर्थ टळला
#FarmerProtest : शेताऱ्यांची नाराजी दूर करण्यासाठी अमित शहा उतरले मैदानात
#FarmerProtest : शेताऱ्यांची नाराजी दूर करण्यासाठी अमित शहा उतरले मैदानात
#CoronaUpdate : कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढल्याने राज्य सरकार अलर्ट
#CoronaUpdate : कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढल्याने राज्य सरकार अलर्ट