MarathawadaNewsUpdate : अर्थसंकल्पात आत्मनिर्भर भारत स्पष्ट – बोराळकर

औरंगाबाद – अर्थसंकल्पात आत्मनिर्भर भारताचा दस्ताऐवज योजनाबध्द केला असल्याची माहिती भाजपा प्रवक्ते शिरीष बोराळकर यांनी उस्मानाबादेत घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.
या अर्थ संकल्पात खेडे,शेतकरी, महिला, युवक , जेष्ठ नागरिक आणि व्यावसायिकांचा विचार करण्यात आला आहे.असे ते म्हणाले. तसेच
कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा जागतिक अर्थव्यवस्थेवर विपरित परिणाम झाला आहे. भारतामधे त्यासाठी नवी कर प्रणाली काही ठिकाणी लागू करण्यात आली आहे.रेल्वे, मेट्रो मालवाहतूक, विमानतळे आणि बंदरे अशा पायाभूत सुविधांसाठी ७लाख ५४हजार कोटी रु.ची तरतूद केली आहे.तसेच ७५ वयापेक्षा जेष्ठ नागरिकांना कर विवरणपत्र भरण्यातून सवलत देण्यात आली आहे.या पत्रकार परिषेत भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे , संतोष पाटील आदिंचीउपस्थिती होती.