AurangabadNewsUpdate : मंडळ अधिकाऱ्याला लाच घेताना गजाआड

औरंंंगाबाद । तक्रारदाराच्या मुलीच्या आणि नातेवाईकाच्या नावाने असलेल्या जमीनीतील खदानीचा आणि पिकाचा पंचनामा करून त्याचा अहवाल तहसीलदारांना सादर करण्यासाठी ५० हजार रूपयांची लाच मागणा-या मंडळ अधिका-यास अॅन्टी करप्शन विभागाच्या पथकाने मंगळवारी ( दि.१६) गजाआड केले. अप्पासाहेब मुरलीधर गोराडे (रा.औरंगाबाद) असे लाचखोर मंडळ अधिका-याचे नाव आहे.
तक्रारदाराच्या मुलीच्या आणि नातेवाईकाच्या नावाने असलेल्या जमीनीतील खदानीचा आणि पिकाचा पंचनामा करून त्याचा अहवाल तहसीलदारांना सादर करण्यासाठी तक्रारदाराने चिकलठाणा येथील मंडळ अधिकारी अप्पासाहेब गोराडे यांच्याकडे अर्ज केला होता. त्यावेळी मंडळ अधिकारी गोराडे यांनी तक्रारदारास खदानीचा आणि पिकाचा पंचनामा करून त्याचा अहवाल तहसीलदारांना सादर करण्यासाठी ५० हजार रूपये लाच देण्याची मागणी केली होती. त्यापैकी २५ हजार रूपये तलाठ्याला आणि २५ हजार रूपये आपल्यासाठी राहतील असे गोराडे यांनी सांगितले होते. तक्रारदारास लाच घेण्याची इच्छा नसल्याने त्याने अॅन्टी करप्शन विभागाकडे तक्रार दिली होती.
अॅन्टी करप्शन विभागाचे पोलिस अधीक्षक डॉ.राहुल खाडे, अपर अधीक्षक डॉ.अनिता जमादार, उपअधीक्षक मारोती पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक गणेश धोक्रट, पोलिस अंमलदार सुनिल पाटील, विजय बाम्हदे, मिलिंद इप्पर, चांगदेव बागुल आदींच्या पथकाने सापळा रचून लाचखोर अप्पासाहेब गोराडे यांना ताब्यात घेतले. याप्रकरणी एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.