BreakingNews : ‘टूलकिट’ प्रकरणातील संशयित शंतनू मुळूक यांना ट्रांझिट आग्रिम जमानत

‘टूलकिट’ प्रकरणातील संशयित शंतनू मुळूक यांना ट्रांझिट आग्रिम जमानत
औरंगाबाद । मुंबई उच्चन्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने टूलकिट प्रकरणातील संशयित आरोपी शंतनू मूळुक यांना मंगळवारी १० दिवसांचा ट्रान्झिट अग्रिम जामीन मंजूर केला. या आरोपींच्या विरोधात ‘टूलकिट’ प्रकरणी दिल्ली पोलिसांनी अटक केली होती. न्यायमूर्ती विभा कंकणवाडी यांच्या खंडपीठाने हा आदेश दिला.
शनिवारी दिल्ली पोलिसांनी या प्रकरणात 21 वर्षीय दिशा रवीला अटक केली होती आणि तिला रविवारी दिल्लीत आणल्यानंतर पटियाला हाऊस दंडाधिका-यांनी तिला 5 दिवसांच्या पोलिस कोठडी सुनावली आहे. टूलकिट प्रकरणात यापूर्वी हवामान खात्यच्या दिशा रवी यांना अटक तर आणि बीडचे शंतनू मूळुक यांनी ट्विटच्या माध्यमातून या प्रकरणात सहभागघेतला होता. अटकेची कारवाई होणार असल्याची भनक लागताच मुळुक यांंनी ट्रांझिट अटकपूर्व जामिनासाठी औरंगाबाद खंडपीठात अँड.सतेज जाधव यांच्यामार्फत अर्ज केला होता.
दिल्लीच्या शेतकरी आंदोलनात ‘टूलकिट’चा वापर करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. या टूलकिट प्रकरणाचे धागेदोरे बीडपर्यंत असल्याचे पुढे आल्याने खळबळ उडाली होती. कारण ‘टूलकिट’ तयार करणाऱ्या तिघांपैकी शंतनू मुळूक बीडचा असल्याचे समोर आले आहे. दिल्ली पोलिसांनी शांतनूच्या बीड आणि औरंगाबाद येथील त्याच्या घरची झाडाझडती घेतली अशी ही माहिती पुढे आली आहे.
दरम्यान दिल्ली पोलिसांनी तब्बल दोन दिवस औरंगाबाद आणि बीडमध्ये शंतनूबाबत चौकशी केली. बीड आणि औरंगाबाद येथील बँक खात्याची चौकशी पोलिसांनी केली. कुठून त्याच्या खात्यावर पैसे आले का किंवा कुणाला पाठवले का, याचीही चौकशी पोलीस करत आहेत.
कोण आहे शंतनू ?
शंतनू याचे प्राथमिक शिक्षण बीड मध्ये झाले आहे. त्याने अमेरिकेतून मेकॅनिकल इंजिनीरिंग पदवी मिळवली आहे. त्याचे वडील शिवलाल हे बीडचे माजी नगराध्यक्ष आहेत. शंतनू हा पर्यावरणवादी कार्यकर्ता आहे. इंजिनियरिंग पूर्ण केल्यानंतर त्याने औरंगाबादेत एका कंपनीमध्ये नोकरी केली. नंतर तो पुण्यात गेला. दरम्यान लॉकडाऊन लागल्यानंतर तो बीडमध्येच राहायला आला होता.