MaharashtraNewsUpdate : ट्र्क उलटून १५ मजूर जागीच ठार

जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यात किनगाव नजीक पपईची वाहतूक करणारा आयशर ट्रक उलटून १५ जणांचा मृत्यू झाल्याची घटना मध्यरात्री दीड वाजता घडली आहे. अपघातग्रस्त ट्रक धुळे जिल्ह्यातील नेर येथून चोपडा मार्गे रावेरला जात होता. मध्यरात्रीच्या किनगाव येथे अचानक ट्रक उलटला. त्यात १५ जण जागीच ठार झाले तर काही जण जखमी झाले. मृतांमध्ये दोन चिमुकल्यांचा समावेश असून हे सगळे रावेर, आभोडा, केऱ्हाळा, विवरा येथील आहेत. जखमींना जळगाव सामान्य रुग्णालयात नेण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ट्रकमध्ये एकूण २१ मजूर असल्याची माहिती आहे.
मृतांमध्ये शेख हुसेन शेख (वय ३० रा. फकीरवाडा, रावेर), सरफराज कासम तडवी (वय ३२, केऱ्हाळा), नरेंद्र वामन वाघ (२५, रा. आभोडा), दिगंबर माधव सपकाळे (५५, रा. रावेर), दिलदार हुसेन तडवी (२०, आभोडा), संदीप युवराज भालेराव (२५, रा. विवरा), अशोक जगन वाघ (४०, रा. आभोडा), दुर्गाबाई संदीप भालेराव (२०, रा. आभोडा), गणेश रमेश मोरे (५, रा. आभोडा), शारदा रमेश मोरे (१५, रा. आभोडा), सागर अशोक वाघ (०३, रा. आभोडा), संगीता अशोक वाघ (३५, रा. आभोडा), सुमनबाई शालीक इंगळे (४५, रा. आभोडा), कमलाबाई रमेश मोरे (४५, रा. आभोडा), सबनुर हुसेन तडवी (५३, रा. आभोडा) यांचा समावेश आहे.