जळगाव अपघाताची पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल

जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यात किनगाव नजीक पपईची वाहतूक करणारा आयशर ट्रक उलटून 16 जणांचा मृत्यू तर 5 गंभीर जखमी झाल्याची घटना मध्यरात्री दीड वाजता घडली आहे. अपघातग्रस्त ट्रक धुळे जिल्ह्यातील नेर येथून चोपडा मार्गे रावेरला जात होता. मध्यरात्रीच्या किनगाव येथे अचानक ट्रक उलटला. यात आभोडा येथील 12, केऱ्हाळा येथील 2 आणि रावेर येथील 2 असे 16 जण जागीच ठार झाले तर 5 जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये दोन चिमुकल्यांचा समावेश आहे. मध्यरात्रीच्या सुमारास किनगावजवळ आयशर टेम्पो पलटून हा अपघात झाला. दरम्यान, या अपघाताची पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दखल घेतली असून आपघातग्रस्तांना मदत जाहीर करण्यात आली आहे.
अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना पंतप्रधान मदत निधीतून दोन लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तर जखमींना 50 हजार रुपये मदत दिली जाणार आहे. या संदर्भात पंतप्रधान कार्यालयाकडून ट्वीट करण्यात आले आहे. शोकाकुल कुटुंबाच्या दु:खात मी सहभागी असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
Heart-wrenching truck accident in Jalgaon, Maharashtra. Condolences to the bereaved families. May the injured recover at the earliest: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) February 15, 2021
PM @narendramodi has approved an ex-gratia of Rs. 2 lakh each from Prime Minister’s National Relief Fund for the next of kin of those who have lost their lives due to the tragic truck accident in Jalgaon, Maharashtra. Rs. 50,000 would be given to those seriously injured.
— PMO India (@PMOIndia) February 15, 2021
किनगाव टेम्पो अपघातातील मृत मजुरांच्या नातेवाईकांना दोन लाखांची मदत तर जखमींच्या उपचाराचा खर्च करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. अपघाताची माहिती मिळताच मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला योग्य त्या सूचना दिल्या.
याशिवाय अपघातात गंभीर व किरकोळ जखमी झालेल्या मजुरांवर शासकीय खर्चाने उपचार करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. अपघाताची माहिती मिळताच मुख्यमंत्र्यांनी जळगाव जिल्हा प्रशासनाकडून घटनेची माहिती घेतली. तसेच संबंधित अपघातग्रस्तांना सर्व ती आवश्यक मदत करण्याचे निर्देश दिले.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) February 15, 2021
माहितीनुसार या टेम्पोत पपई भरुन हा टेम्पो रावेरकडे निघाला होता. त्याचवेळी मध्यरात्रीच्या सुमारास चालकाचे नियंत्रण सुटल्यानं टेम्पो पलटी झाला. या अपघातात मृतांमध्ये शेख हुसेन शेख (वय ३० रा. फकीरवाडा, रावेर), सरफराज कासम तडवी (वय ३२, केऱ्हाळा), नरेंद्र वामन वाघ (२५, रा. आभोडा), दिगंबर माधव सपकाळे (५५, रा. रावेर), दिलदार हुसेन तडवी (२०, आभोडा), संदीप युवराज भालेराव (२५, रा. विवरा), अशोक जगन वाघ (४०, रा. आभोडा), दुर्गाबाई संदीप भालेराव (२०, रा. आभोडा), गणेश रमेश मोरे (५, रा. आभोडा), शारदा रमेश मोरे (१५, रा. आभोडा), सागर अशोक वाघ (०३, रा. आभोडा), संगीता अशोक वाघ (३५, रा. आभोडा), सुमनबाई शालीक इंगळे (४५, रा. आभोडा), कमलाबाई रमेश मोरे (४५, रा. आभोडा), सबनुर हुसेन तडवी (५३, रा. आभोडा) यांचा समावेश आहे.