#FarmersProtest : 26 जानेवारीतील हिंसाचार प्रकरणातील मुख्य आरोपी दीप सिंधूला अटक

दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलच्या पथकाने २६ जानेवारीला लाल किल्ल्यात आणि दिल्लीच्या इतर भागांतील हिंसाचारातील मुख्य आरोपी दीप सिद्धूला अटक केली आहे. त्याला शोधण्यासाठी त्याची छायाचित्रे सार्वजनिक क्षेत्रात लावण्यात आले होते. तसेच त्याच्या अटकेवर १ लाख रुपयांचे बक्षीसही जाहीर करण्यात आले होते. सध्या पुढील चौकशी सुरू असल्याची माहिती दिल्ली पोलिस पीआरओ चिन्मय बिस्वाल यांनी दिली आहे.
Delhi Police Special Cell team arrests Deep Sindhu, one of the main accused in 26th January violence case. https://t.co/eu9VngMXv0 pic.twitter.com/qMemqw6hpL
— ANI (@ANI) February 9, 2021
प्रजासत्ताक दिनी आयोजित शेतकरी ट्रॅक्टर रॅलीत हिंसा भडकवल्याचा त्याच्यावर आरोप आहे. प्रजासत्ताक दिनाच्या दिवसापासून तो फरार होता. पोलिसांनी आरोपींना ९ फेब्रुवारी रोजी अटक केली आहे. तो एक पंजाबी अभिनेता आणि एक्टिविस्ट आहे. लाल किल्ल्यावरील हिंसाचारात दाखल झालेल्या एफआयआरमध्ये गैंगस्टर लक्का सदाना आणि अभिनेता दीप सिंधू यांची नावे आहेत.