#FarmersProtest : पंतप्रधानांच्या आवाहनानंतरही शेतकरी भूमिकेवर ठाम

दिल्ली पोलिसांनी सीमेवर तैनात केलेला अतिरिक्त पोलिस बंदोबस्त मागे घेतला असून अतिरिक्त पोलिसांना आपापल्या युनिट्स आणि जिल्ह्यात परत पाठवण्यात येत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले आहे. परंतु पंतप्रधानांच्या आवाहनानंतरही शेतकरी भूमिकेवर ठाम आहेत. कृषी कायदे मागे घ्या, या मागणीचा पुनरुच्चार शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी केला.
पंतप्रधान म्हणाले की आज ‘एमएसपी है, था और रहेगा’ पण एमएसपी (किमान आधारभूत किंमत) वर कायदा तयार होईल, असे ते म्हणाले नाहीत … देश विश्वासावर चालत नाही. देश संविधान आणि कायद्यावर चालतो : राकेश टिकैट, भारतीय किसान युनियन
“सर्वांनी हे स्पष्ट केले पाहिजे की शेतकरी मोठ्या प्रमाणात ‘अण्णादाता’च्या हितासाठी लढत आहेत. हा संघर्ष केवळ एका धर्मावर किंवा समुदायापुरता मर्यादित ठेवण्याचा प्रयत्न करू नये, त्याऐवजी शेतकऱ्यांना “न्याय” मिळण्यावर भर दिला पाहिजे. असे शिरोमणि अकाली दल (एसएडी) अध्यक्ष सुखबीर सिंह बादल यांनी पंतप्रधानांना आवाहन केले आहे.
शेतकऱ्यांमध्ये फूट पाडण्याचा भाजपचा प्रयत्न करत आहे, सचिन तेंडुलकर, लता मंगेशकर यांच्यासारख्या सेलिब्रिटींची दिशाभूल होत आहे: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार अधीर रंजन चौधरी
केंद्र सरकारच्या दबावाखाली सेलिब्रिटींनी ट्वीट केलं का? याची तपासणी केली जाणार – अनिल देशमुख
किसान सन्मान योजनेचे ६ लाख अर्ज पडताळणीसाठी गेले पण राज्याला निधी मिळालाच नाही – ममता बॅनर्जी
पंतप्रधान सोमवारी राज्यसभेत काय बोलणार ? याचे उत्तर विरोधकांना आणि आंदोलक शेतकऱ्यांना दिले आहे. या भाषणात त्यांनी विरोधकांना कानपिचक्या देण्याची एकही संधी न सोडता , शेतकऱ्यांनी आंदोलन संपवावे. एकत्रित बसून चर्चा करता येईल, असे आवाहन केले. शिवाय त्यांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारण्याचा प्रयत्न करीत शार पवार यांच्यावरही तोफ डागण्याचा प्रयत्न केल.
कृषी कायद्यावर पंतप्रधान ठाम !! एकाच दगडात अनेक पक्षी मारण्याचा मोदींचा प्रयत्न