सरकारी कंपन्या विकू देणार नाही! – आंबेडकरांनी मोदी सरकारला ठणकावले

केंद्र सरकार सरकरी कंपन्यांचे खासगीकरण करणार असल्याचे कंपन्यांना वाटत असल्यामुळे शेअर मार्केट वर गेेले आहे. मात्र, केंद्राने कितीही प्रयत्न केला तरी आम्ही कोणत्याही परिस्थितीत पब्लिक सेक्टर विकू देणार नाही, असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केंद्र सरकारला दिला आहे.
प्रकाश आंबेडकरांनी गुरुवारी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते. आंबेडकर म्हणाले, कोरोना काळात शेअर मार्केट खेळण्यासारखे झाले होते. मात्र आता ते सावरले आहे. केंद्र सरकारने कोरोनानंतर आपले पहिले बजेट सादर केले आहे. सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पातील आकडेवारी पाहिली तर केंद्राच्या तिजोरीत 19,76,424 लाख कोटी रुपये आहेत. सेन्सेक्स वाढल्याने अनेकांना सरकारने चांगले बजेट मांडले असे वाटत आहे. पण वस्तुस्थिती वेगळी असल्याचे आंबेडकरांनी सांगितले. दरम्यान, कोरोना काळात आयटी सेक्टरमधील कामगार हे व्हर्च्युअली काम करत होते. तसेच लॉकडाऊनमुळे ज्यांचे पुनर्वसन झाले त्यांची परिस्थिती वाईट आहे. त्यांना नातेवाईकांच्या रेशनकार्डवर धान्य घ्यावे लागत आहे. त्यांच्यासाठी या बजेटमध्ये काहीच नाही, अशी टीकाही आंबेडकरांनी केंद्र सराकारवर केली आहे.