बिग बॉसमफेम स्वामी ओम यांचे निधन

प्रसिद्ध रिअॅलिटी शो बिग बॉसमफेम स्वामी ओम यांचे निधन झाले आहे. ते 63 वर्षांचे होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती. त्यामुळे त्यांना उपचारासाठी एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होते . परंतु, आज त्यांची प्राणज्योत मालवली. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वामी ओम यांना अर्धांगवायूचा झटका आला होता. तेव्हापासूनच ते प्रकृती अस्वास्थाने त्रस्त होते.
दरम्यान, स्वामी ओम 2017 मध्ये बिग बॉसमध्ये दिसून आले होते. या सीझनमध्ये त्यांच्यामुळे अनेक वाद झाले होते. तसेच अनेकदा स्वामी ओम यांनी बिग बॉसच्या घरात आपल्या मर्यादाही ओलांडल्या होत्या. त्यांनी बिग बॉसच्या 10 व्या सीझनमध्ये प्रतिस्पर्धी रोहम मेहरा आणि बानी यांच्या अंगावर मूत्र फेकलं होतं. यामुळे त्यांना बिग बॉसच्या घरातून बाहेर काढण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांनी बॉलिवूड अभिनेता सलमान खानला थोबाडीत मारल्याचाही दावा केला होता. बिग बॉसमध्ये गेल्यानंतर अनेक हिंदू संघटनांनी स्वामी ओम यांच्यावर बहिष्कार घातला होता.