Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabaNewsUpdate : करमाड पोलिस ठाण्याचा लाचखोर कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात

Advertisements
Advertisements
Spread the love

औरंंंगाबाद : करमाड पोलिस ठाण्यात तक्रारदाराविरूध्द दाखल असलेल्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी ७ हजार रूपयांची लाच घेणा-या पोलिस कर्मचा-यााला व त्याला मदत करणा-या अ‍ॅपे रिक्षाचालकाला अ‍ॅन्टी करप्शन विभागाच्या पथकाने शनिवारी (दि.३०) रंगेहाथ पकडले. सिराज इकबाल पठाण असे लाचखोर पोलिस कर्मचा-याचे नाव आहे, तर युवराज नाथा मुळे (रा.करमाड) असे त्याला मदत करणा-या अ‍ॅपे रिक्षाचालकाचे नाव आहे.

Advertisements

तक्रारदाराविरूध्द करमाड पोलिस ठाण्यात हुंडाप्रतिबंधक कायद्यान्वये ४९८ चा गुन्हा दाखल आहे. दाखल असलेल्या गुन्ह्यात मदत करण्यासाठभ् सिराज इकबाल पठाण याने तक्रारदाराकडे ७ हजार रूपयांची लाच मागीतली होती. तसेच लाचेचे पैसे अ‍ॅपेरिक्षाचालक युवराज मुळे याच्याकडे देण्याचे सांगितले होते. परंतु, तक्रारदाराला लाच देण्याची इच्छा नसत्याने त्याने अ‍ॅन्टी करप्शन विभागाकडे तक्रार दिली होती.
अ‍ॅन्टी करप्शन विभागाचे पोलिस अधीक्षक डॉ. राहुल खाडे, अपर अधीक्षक डॉ. अनिता जमादार, उपअधीक्षक बी.व्ही.गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक नंदकिशोर क्षीरसागर, पोलिस अंमलदार गणेश पंडूरे, रविंद्र देशमुख, मिलिंद इप्पर, चांगदेव बागूल यांच्या पथकाने सापळा रचून करमाड पोलिस ठाण्याच्या सिराज पठाण यांच्यासह त्यांच्यासाठी लाच स्विकारणाNया युवराज मुळे यांना ताब्यात घेतले. याप्रकरणी करमाड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisements
Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!