FarmersAgitationUpdate : शेतकरी आंदोलन हिंसाचार , पंजाबच्या मख्यमंत्र्यांचा हाय अलर्ट

मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांनी दिल्लीत शेतकरी आंदोलनात झालेल्या हिसांत्मक घटनेच्या पार्श्वभूमीवर पंजाबमध्ये हाय अॅलर्ट जारी केला आहे. सर्व खऱ्या शेतकऱ्यांनी दिल्लीमधून परत सीमांवर यावं, असं आवाहन पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी केलं आहे. तसेच. राज्याचे DGP दिनकर गुप्ता यांना आदेश देत राज्यात हिंसात्मक घटना होऊ नयेत, याची दक्षता घेण्यास सांगण्यात आले आहे. शेतकरी आंदोलनामध्ये झालेली हिंसा काही घटकांकडून करण्यात आली असावी, असा संशय अमरिंदरसिंग यांनी व्यक्त केला आहे. समाजकंटकांच्या आंदोलनामुळे शेतकऱ्यांनी आतापर्यंत केलेल्या शांततापूर्ण आंदोलनाला ठेच पोहोचल्याचं अमरिंदरसिंग म्हणाले.