बाळासाहेबांच्या जयंतीदिनी पोलिसआयुक्तांनी जाणून घेतल्या सहकार्यांच्या अडचणी

औरंगाबाद – नेताजी सुभाषचंद्र बोस आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधुन पोलिस मुख्यालयातील महिला आणि पुरुष अंमलदारांच्या अडचणी जाणून घेत पोलिसआयुक्त डाॅ.निखील गुप्ता यांनी आस्थेवाईकपणे चौकशी केली.
महापुरुषांच्या जयंती किंवा पुण्यतिथीनिमित्त एकत्र येऊन भाषणे ठोकण्यात आणि हार तुरे वाहण्यात धन्यता माणनारे फोटोसेशन करुन स्वता:ची जाहिरात करणारे नेते, पुढारी, वरिष्ठ अधिकारी आपण नेहमीच बघतो.पण या गोष्टींना बाजूला सारुन पोलिसायुक्त डाॅ.गुप्ता यांनी दोन्ही महापुरुषांच्या प्रतिमांना सपुष्प अभिवादन केल्यानंतर कार्यक्रमाला जमलेल्या आपल्या सहकार्यांशी आपुलकीचा संवाद साधला.पोलिसआयुक्तांच्या या कृतीने मुख्यालयातील पोलिस सुखावले आहेत.महिला व पुरुष अंमलदारांनीही यावेळी मनमोकळेपणाने डाॅ.गुप्ता यांना अडचणी सांगितल्या. यावेळी पोलिसउपायुक्त मकवाना, एसीपी अनिल आडे, सुरेश वानखेडे यांची उपस्थिती होती.