रोजगार बुडालेल्या तरुणांना सहा हजारांचे अमीष दाखवून अडीच लाखांची देशी दारु लंपास करणारे चार तासात जेरबंद

औरंगाबाद – कोरोना काळात रोजगार गेल्यामुळे साडू नौकरी करंत असलेल्या देशी दारुचे दुकान २० जानेवारीच्या मध्यरात्री फोडूनअडीच लाखांचा मुद्देमाल वाहनासहित २८बाॅक्स लंपास करणार्या चौघांनारोपींना पुंडलिकनगर पोलिसांनी चार तासात मुद्देमालासहित जेरबंद केले.
भगवान वसंत जैस्वाल,रा. मुकुंदवाडी, पवन विजय जातैकर (३१) रा. चेलीपुरा धंदा मजुरी,गणेश सखाहरी गवळै (२९) रा. चेलीपुरा आणि प्रशांत दत्त प्रसाद शिसोरिया (४०) रा. केळीबाजार अशी अटक आरोपींची नावे आहेत.मुकुंदवाडी रेल्वेस्टेशनजवळ असलेल्या देशी दारु चे दुकान त्या ठिकाणी काम करत असणार्या नितेश सुरेशलाल जैस्वाल (३६) रा. नारेगाव याचा साडू भगवान जैस्वाल याने ओळखीच्या बेरोजगार तरुणांना प्रत्यैकी सहा सहा हजारांचे अमीष दाखवून फोडायला लावले व देशी दारु तसेच दुकानातील सी.सी. टि.व्ही. चे डि.व्ही.आर लंपास करुन प्रशांत शिसोरिया या आरोपीला विकला. शिसोरिया हा पूर्वी देशी दारुचा व्यापारी होता. हा सगळा घटनाक्रम खबर्याने एपीआय घन्नशाम सोनवणे यांना सांगताच त्या अनुषंगाने तपास करंत पुंडलिकनगर पोलिसांनी गुन्हा उघडकीस आणला.
वरील कारवाईत पीएसआय धनाजी आढाव, रमेश सांगळे , बाळाराम चौरे,शिवाजी गायकवाड, प्रविण मुळे या पोलिस कर्मचार्यांनी सहभाग घेतला हौता.