#CrimeNews : रेकाॅर्डवरील गुन्हेगाराकडून फुटपाथवर झोपण्यासाठी वृध्दाचा खून,आरोपी अटक

औरंगाबाद – फुटपाथवर झोपण्यासाठी पहाटे दीड वा. वृध्दाच्या डोक्यात दगड घालून खून करणार्या रेकाॅर्डवरील गुन्हेगाराला तीन तासात वाळूज औद्योगिक पोलिसांनी अटक केली.
बजाजनगरातील घृष्णेश्र्वर रुग्णालयासमोर हा खून आज पहाटे दीड वा.केल्याचे सी.सी. टिव्ही फुटेज मिळाले आहे. रेकाॅर्डवरील गुन्हेगार भारत राजू गडवे(२३) रा.वडगाव कोल्हाटी असे अटक आरोपीचे नाव आहे. तर सोमिनाथ भुरा राठोड(६०) रा.आडगावपळशी हे मयताचे नाव आहे.फुटपाथवर झोपण्यासाठी भारत गडवे आणि सोमिनाथ राठोड यांच्या दोघात दारुच्यानशेत भांडण झाले. संतापलेल्या गडवे ने सोमिनाथ च्या डोक्यात दगड घातल्याची कबुली पोलिसांना दिली. वरील कारवाई पोलिस निरीक्षक दिलीप गांगुर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय गौतम वावळे, पीएसआय सतीष पंडीत, प्रशांत गंभीरराव नवाबशेख,भीमराव शेवगे यांनी पार पाडली.