ब्राम्हण समाज संघर्ष समितीचे ताम्हण-पळी बजाओ आंदोलन विभागीय आयुक्त कार्यालय परिसर दणाणला

औरंंगाबाद : ब्राम्हण समाजाचे आर्थिक सर्वेक्षण करण्यात यावे, ब्राम्हण समाजातील विद्याथ्र्यांना केजी टु पीजी शिक्षण मोफत देण्यात यावे, पुरोहित समाजाला दरमहा ५ हजान रूपये मानधन सुरू करावे, ब्राम्हण समाजासाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करून १ हजार कोटी रूपयांची तरतूद करण्यात यावी आदी मागण्यांसाठी ब्राम्हण समाज संघर्ष समितीच्या वतीने शुक्रवारी (दि.२२) विभागीय आयुक्त कार्यालयासमोर ताम्हण-पळी बजाओ आंदोलन करण्यात आले.
ब्राम्हण समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यासाठी गेल्या तीन ते चार वर्षापासून विविध मार्गाने आंदोलन करण्यात येत आहे. ब्राम्हण समाज संघर्ष समितीच्या वतीने शुक्रवारी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर ताम्हण-पळी बजाओ आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात ब्राम्हण समाज संघर्ष समितीचे दीपक खनवरे, प्रमोद पुसरेकर, धनंजय कुलकर्णी, विजया कुलकर्णी, विजया अवस्थी यांच्यासह मोठ्या संख्येने ब्राम्हण समाज संघर्ष समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी आंदोलकांनी आपल्या विविध मागण्यांचे निवेदन विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांना दिले.