शक्ती कायद्याबाबत ३० जानेवारीला औरंगाबादेत बैठक गृहमंत्री अनिल देशमुख यांची प्रमुख उपस्थिती

औरंंगाबाद : शक्ती कायद्या संदर्भात शहरात येत्या ३० जानेवारी रोजी गृहमंत्री अनिल देशमुख पोलिसआयुक्तालयात विशेष बैठक घेणार आहेत करण्यात आली आहे.अशी माहिती त्यांचे सचिव वैभव तुमाने यांनी महानायक शी बोलतांना दिली.
या बैठकीत या कायद्यासंदर्भात शहरातील विविध महिला संघटना तसेच वकील संघटनांकडून महत्वाच्या सुचना तसेच निवेदने घेण्यात येणार आहे. शक्ती कायद्यासंदर्भात मुंबईत एक बैठक घेण्यात आलेली आहे. मुंबईच्या बैठकीत ४६ वकील आणि महिला संघटनांकडून निवेदन देण्यात आले होते. या बैठकीनंतर गृह मंत्री अनिल देशमुख यांनी पुढील बैठक औरंगाबादेत घेण्याचा निर्णय जाहिर केला होता. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ही बैठक ३० जानेवारी रोजी घेण्याचीही घोषणा केली होती. त्यानुसार ही बैठक होणार असून या बैठकीत समितीचे सदस्य हे आपले निवेदन तसेच शक्ती कायद्याबाबतच्या सुचना मांडतील असे सूत्रांनी सांगितले