मुख्य न्यायाधिश दत्ता २०ते २५ जानेवारी दरम्यान शहरात

औरंगाबाद – औरंगाबाद खंडपीठातील न्यायदानाचे काम तसेच कार्यालयीन व्यवस्थापनाच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी राज्याचे मुख्य न्यायाधिश दिपंकर दत्ता येत्या२०ते २५जानेवारी दरम्यान शहरात येणार आहेत. अशी माहिती सूत्रांनी दिली.
शहरात वास्तव्यास आल्यानंतर खंडपीठाचे मुख्य न्यायमूर्ती रविंद्र घुगे यांच्या समवेत न्या.दिपंकर दत्ता कामकाज बघणार आहेत. तसेच दिवाणी आणि फौजदारी स्वरुपाच्या जनहित याचिकांवर आदेश देणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.