CoronaNeUpdate : बॅडमिंटन स्टार सायना नेहवाल कोरोना बाधित

बॅडमिंटन स्पर्धा खेळण्यासाठी थायलंडमध्ये असलेल्या सायना नेहवालला कोरोनाची लागण झाली असल्याचे वृत्त आहे. थायलंडच्याच रुग्णालयात सायनाला क्वारंटाईन करण्यात आले आहे. कोरोना पॉझिटिव्ह आल्यामुळे हा सायनासाठी मोठा धक्का आहे. कारण १२ ते १७ जानेवारीदरम्यान योनेक्स थायलंड ओपन खेळवलं जाणार होतं. यानंतर आता १९ ते २४ जानेवारीदरम्यान टोयोटा थायलंड ओपन आणि २७ ते ३१ जानेवारीदरम्यान बीडब्ल्यूएफ वर्ल्ड टूर फायनल्स होणार आहेत. मात्र आता तिला या स्पर्धांमध्ये खेळात येणार नाही , हे स्पष्ट आहे.
Thailand open 2021 👍 #bangkok #badminton #tournament 😊 pic.twitter.com/kHDYbhOtZo
— Kashyap Parupalli (@parupallik) January 8, 2021
दरम्यान याआधी सायना नेहवाल बँकॉकमध्ये होणाऱ्या या स्पर्धांबाबत असलेल्या प्रतिबंधांबाबत समाधानी नव्हती. कोरोनाच्या प्रोटोकॉलबद्दल सायनाने नाराजी उघड केली होती. ३० वर्षांची सायना नेहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्यामुळे आता या स्पर्धांमध्ये खेळण्याची शक्यता कमी झाली आहे. सायनाने ट्रेनर आणि फिजियोला भेटण्याची परवानगी न दिल्यामुळे वर्ल्ड बॅडमिंटन महासंघावर (BWF) टीका केली होती. खेळाडूंना याबाबत आधीच माहिती द्यायला पाहिजे होती, असं सायना नेहवाल म्हणाली होती. थायलंडमध्ये सायनाला तिच्या सपोर्ट स्टाफला भेटण्याची परवानगी मिळाली नव्हती. भारतीय टीममध्ये सायना नेहवाल, किदांबी श्रीकांत आणि बी. साई प्रणित आहेत. तर वर्ल्ड चॅम्पियन पीव्ही सिंधू इंग्लंडवरून थेट थायलंडला रवाना झाली होती. सिंधू ऑक्टोबरपासून इंग्लंडमध्ये सराव करत आहे.