सव्वा लाखांची वीज चोरी : चौघांविरोधात गुन्हा दाखल

औरंगाबाद येथे वीज चोरी करुन महवितरणचे एक लाख २६ हजार ६६० रुपयांचे नुकसान केल्याप्रकरणी चौघांविरोधात सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी महावितरणचे उपकार्यकारी अभियंता प्रविण पाटीवीजल यांनी दिलेल्या तक्रारीनुसार गारखेडा परिसरातील सपना सुपर मार्केटजवळील मोहम्मद आदिल खान अलिस अजहर आणि स्वप्नील नरवडे या दोघांनी मागील दोन वर्षापासून नऊ हजार ९० युनिटची सुमारे ९५ हजार ६६० रुपयांची वीजचोरी केली. हा प्रकार ३ नोव्हेंबर २०२० रोजी उघडकीस आला. तर दुस-या घटनेत एक महिला संशयित तसेच दौलत बाबासाहेब जाधव (रा. बालाजी नगर) या दोघांनी पाच हजार ७०२ युनिटची वीजचोरी करुन महावितरणचे ३१ हजार रुपयांचे नुकसान केल्याचे १७ मार्च २०२० रोजी समोर आले. या प्रकरणात पाटील यांनी बुधवारी चौघांविरुध्द तक्रार दिली. याप्रकरणाचा पुढील तपास जमादार राणे व कोतकर करत आहेत.