MaharashtraNewsUpdate : मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पुढील तीन दिवस वादळी-वाऱ्यासह पाऊस

राज्याच्या हवामानात मोठा बदल झाला असून अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे वातावरणात मोठा बदल झाला असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे . या बदलामुळे ऐन हिवाळ्यात पाऊस आणि गारा पडत असल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान भारतीय हवामान विभागानं महाराष्ट्रातील १८ जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी केला होता. तर पुढचे तीन तास महत्त्वाचे असून राज्यातील १२ जिल्ह्यांमध्ये वादळीवाऱ्यासह पाऊस पडेल असा अंदाज स्कायमेटकडून वर्तवण्यात आला आहे.
#WeatherAlert for #Maharashtra: Rain and thundershower with strong winds over Chanderpur, Kolhapur, Latur, Nanded, Osmanabad, #Pune, Raigad, Ratnagiri, Sangli, Satara, Sindhudurg and Solapur districts during the next 3-4 hours. #WeatherForecast #weather pic.twitter.com/4ku8Kw289L
— Skymet (@SkymetWeather) January 7, 2021
दरम्यान स्कायमेटने दिलेल्या माहितीनुसार चंद्रपूर, कोल्हापूर, लातूर, नांदेड, उस्मानाबाद, पुणे, रायगड, रत्नागिरी, सातारा, सांगली, सिंधुदुर्ग आणि सोलापूर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर कुलाबा वेधशाळेने वर्तवलेल्या आंदाजानुसार ७ जानेवारी ते ९ जानेवारीपर्यंत १८ जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. उस्मानाबाद, लातूर, बीड, जालना, सोलापूर, सांगली, सातारा, पुणे, कोल्हापूर, यवतमाळ, वाशीम, वर्धा, अकोला, नागपूर, बुलडाणा, अमरावती, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये वादळीवाऱ्यासह मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज वर्तवला आहे.
अचानक बदलणारे हवामान आणि अवकाळी पावसामुळे शेतकरी चिंतेत आला आहे. पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. आता पाऊस पडला तर आंबा काजूला आलेला मोहोर गळून पडेल अशी शेतकऱ्यांना भीती आहे. मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी-वाऱ्यासह पुढील तीन दिवस पाऊस होईल असा अंदाज भारतीय हवामान विभागानं व्यक्त केला आहे. ७ ते ९ जानेवारीदरम्यान बीड, जालना, अकोला, सोलापुरात गारपीट आणि मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.