एसबीआयने मोठ्या पेमेंटसाठी लागू केले “पॉझिटिव्ह पे सिस्टम”

1 जानेवारी 2021 पासून भारतीय स्टेट बँक ने चेक पेमेंटसाठी नवी पॉझिटिव्ह पे सिस्टम लागू केली आहे. यामध्ये चेकद्वारे 50,000 रुपयांपेक्षा जास्त पेमेंटसाठी आवश्यक माहिती दुसर्यांदा कन्फर्म करण्याची आवश्यकता असणार आहे.
एसबीआयने म्हटले आहे की, आरबीआयच्या मार्गदर्शक तत्वांनुसार आम्ही अधिक सुरक्षेसाठी 01/01/2021 पासून पॉझिटिव्ह पे सिस्टम (पीपीएस) ची सुरूवात करत आहोत. यामध्ये चेक जारी करणार्याला पेमेंटच्यावेळी आता खाते क्रमांक, चेक क्रमांक, चेक रक्कम, नाव इत्यादी माहिती द्यावी लागेल. असे केल्याने फसवणूक टाळण्यास मदत होणार आहे.
एसबीआयने याबाबत ट्विट करत म्हटले आहे की, चेकच्या माध्यमातून केलेला तुमचा व्यवहार सुरक्षित ठेवण्यासाठी 1 जानेवारी 2021 पासून एसबीआयने पॉझिटिव्ह पे सिस्टम सक्रिय केली आहे. अधिक माहितीसाठी आपल्या जवळच्या एसबीआय शाखेशी संपर्क करा. एसबीआयने आपल्या ग्राहकांना सांगितले आहे की, त्यांनी पॉझिटिव्ह पे सिस्टमचा ऑपशन निवडावा. कोणत्याही प्रश्नासाठी आपल्या जवळच्या शाखेशी संपर्क साधा.
भारतीय रिझर्व्ह बँकेने चेक-आधारित व्यवहाराला प्रोत्साहन देण्यासाठी पॉझिटिव्ह पे सिस्टम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. जेणेकरून फसवणुकीची प्रकरणे कमी करता येतील. केंद्रीय बँकेने पॉझिटिव्ह पे सिस्टमच्या सुविधेबाबत आपल्या ग्राहकांमध्ये योग्य जागृतता निर्माण करण्याचा सुद्धा सल्ला दिला आहे. पॉझिटिव्ह पे सिस्टम अंतर्गत चेक जारी करणारा व्यक्ती बँकेला एसएमएस, इंटरनेट बँकिंग, मोबाइल अॅप, एटीएम इत्यादी इलेक्ट्रॉनिक माध्यमातून चेकसंबंधी काही आवश्यक माहिती देईल. ही सुविधा नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाद्वारे विकसित केली जात आहे.