MaharashtraNewsUpdate : महाविकास आघाडी सरकारने संभाजी भिडेंना आता अटक करावी : रामदास आठवले

केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी विचारलेल्या आपल्या नेहमीच्या स्टाईलमध्ये उत्तरे दिली. भीमा कोरेगाव प्रकरणावर बोलताना आठवले म्हणाले कि , जे खरे नक्षलवादी आहेत, त्यांना पकडलंच पाहिजे. सध्याचे राज्यकर्ते आणि त्यावेळचे विरोधक संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी करीत होते. आता सरकार येऊन वर्ष झालं. हे सरकार मूग गिळून गप्प का आहे? त्यांनी कारवाई करायला पाहिजे. आता त्यांनी अटक करावी. दरम्यान आंबेडकरी अनुयायांना उद्धेशून ते म्हणाले कि , कोरोनामुळे यंदा भीमा-कोरेगावला येऊ नका. घरातच प्रार्थना करावी. मी एक जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता तिथे जाऊन अभिवादन करणार आहे.
शेतकरी आंदोलावर विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना ते म्हणाले कि , “शेतकऱ्यांना दिलासा मिळाला पाहिजे. सरकारने आडमुठे धोरण स्वीकारलेले नाही, चर्चेचे दरवाजे खुले आहेत. मात्र कायदे रद्द होणार नाहीत. त्यासाठी शेतकऱ्यांनी अट्टाहास करू नये. काँग्रेस पक्षाच्या जाहीरनाम्यात हा कायदा करण्याचा मुद्दा होता. आता ते विरोध करत आहेत. आंदोलन राजकीय सुरू झाले आहे. आता ते शेतकर्यांच आंदोलन राहिले नाही. त्यात फक्त पंजाब आणि हरयाणाचे शेतकरी आहेत”.
“गो कोरोना गो…” नंतर आता आठवलेंची ” नो कोरोना नो “
मराठा आरक्षण बाबत बोलताना ते म्हणले कि , राज्य सरकारला सुप्रीम कोर्टात बाजू मांडता आली नाही. मराठा समाजाला आरक्षण मिळाव ही आमची सुरुवाती पासून मागणी राहिली असून ते मिळाले पाहिजे असे रामदास आठवले म्हणाले. दरम्यान त्यांना ब्रिटनमधील नव्या कोरोनाच्या स्ट्रेन संदर्भात प्रश्न विचारला तेंव्हा कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात त्याला हद्दपार करण्यासाठी ‘गो कोरोना, कोरोना गो’ असा नारा देणाऱ्या रामदास आठवले यांनी आता ‘नो कोरोना, कोरोना नो.’ नव्या कोरोना स्ट्रेनचा भारतात शिरकाव होऊ नये यासाठी हा नारा दिल्याचे म्हटले आहे. त्यावेळी मी ‘गो करोना’ घोषणा दिली होती. कोरोना जात आहे, पण तो माझ्या जवळ सुद्धा येत आहे. एकदा करोना माझ्या सुद्धा जवळ आला होता. मी हॉस्पिटलमध्ये अॅडमिट होतो. मला वाटतं होतं, करोना पोहोचणार नाही. पण करोना कुठेही पोहोचू शकतो. म्हणूनच नवीन करोनाबद्दल ‘नो करोना’, ‘नो करोना’ मी म्हणीन. करोना नवीन असो किंवा जुना आता तो नको आहे रामदास आठवले म्हणाले.
मी मुख्यमंत्र्यांना म्हणालो तुम्हीच इकडे या…
चैत्यभूमीच्या कार्यक्रमा दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सोबत काही मिनिट भेट झाली. तेव्हा मुख्यमंत्री म्हणाले की, रामदास आठवले तुम्ही इकडे या, पण मीच त्यांना म्हटले तुम्हीच परत इकडे या. देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत अजित दादा एकदिवस येणार आहेत. म्हणून ते म्हणत आहेत की, मी पुन्हा येईन, पुन्हा येईन असे रामदास आठवले म्हणाले. चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूरला जाणार असे म्हटले आहे. मात्र ते मूळचे कोल्हापूरचे असून आता ते पुण्यातच आहेत. त्यांचं मिशन पूर्ण झाल्याशिवाय ते जाणार नाहीत, असेही रामदास आठवले म्हणाले.