MaharashtraCoronaUpdate : गेल्या २४ तासात राज्यात आढळले २,८५४ नवीन रुग्ण , लंडनहून आलेले १६ प्रवासी पॉझिटिव्ह

गेल्या २४ तासात राज्यात २,८५४ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर ६० करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर हा २.५७ टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,२४,५१,९१९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १९,१६,२३६ (१५.३९ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ४,६४,१२१ व्यक्ती होमक्वारंटाइन आहेत, तर ३,७०४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. दरम्यान आज रुग्णालयातून बरे होऊन गेलेल्या रुग्णांची संख्या १,५२६ इतकी आहे. यानुसार राज्यात आजपर्यंत एकूण १८,०७,८२४ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९४.३४ टक्के एवढे झाले आहे. राज्यात सध्या करोनाचे एकूण ५८,०९१ जण अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
राज्यात आज 2854 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 1526 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 1807824 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 58091 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 94.34% झाले आहे.#CoronaVirusUpdates
— Rajesh Tope (@rajeshtope11) December 26, 2020
राज्यात ब्रिटनहून आलेल्या प्रवाशांचे सर्वेक्षण
ब्रिटनमधील नवीन करोना व्हायरसमुळे सर्वच देश सतर्क झाले आहेत. नवीन करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर २५ नोहबर २०२० नंतर राज्यात ब्रिटनहून आलेल्या प्रवाशांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. याची माहिती पुढील प्रमाणे-
– आज राज्यात आर टी पी सी आर चाचण्या करण्यात आलेले प्रवासी – ११२२
– यापैकी कोरोना बाधित आढळलेले प्रवासी – १६ ( नागपूर – ४, मुंबई आणि ठाणे प्रत्येकी -३, पुणे -२ आणि नांदेड, अहमदनगर, औरंगाबाद व रायगड प्रत्येकी १)
– पॉझिटिव्ह रुग्णांचे नमुने जनुकीय रचना शोधण्यासाठी पुण्यातील NIV येथे पाठण्यात आले आहेत.
– बाधित रुग्णांच्या संपर्कात येणाऱ्यांचा शोध घेण्यात येत आहे. आजवर शोधण्यात आलेल्या ७२ जणांपैकी ३ जण करोना बाधित आढळून आले आहेत.
दरम्यान, डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात इंग्लंडमधून प्रवास करून परतलेल्या पुण्यातील एका व्यक्तीचा करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती आरोग्य आधिकाऱ्यानं दिली आहे. त्या व्यक्तीची प्रकृती सध्या स्थिर असून, त्याची करोनाच्या विषाणूची स्ट्रेन इंग्लंडमध्ये उद्रेक झालेल्या विषाणूंशी मिळती-जुळती आहे का? हे तपासण्यासाठी त्यांचे नमुने पुण्यातील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडे (एनआयव्ही) पाठविण्यात येणार आहेत, अशी माहिती पुणे महानगर पालिकेचे सहायक मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. संजीव वावरे यांनी दिली आहे. याशिवाय कल्याण आणि औरंगाबाद मध्ये आढळलेल्या रुग्णांचा अहवालही अद्याप अप्राप्त आहे.
Maharashtra reports 2,854 new #COVID19 cases, 1,526 discharges, and 60 deaths today, as per State Health Department
Total cases: 19,16,236
Total recoveries: 18,07,824
Total active cases: 58,091 pic.twitter.com/qKqNLqc6cy
— ANI (@ANI) December 26, 2020