IndiaNewsUpdate : शेतकरी आंदोलनाच्या मुद्द्यावरून “या” मित्र पक्षानेही एनडीएला दिली फारकत

भारत सरकार द्वारा लाये गए कृषि विरोधी बिलों के कारण आज @RLPINDIAorg पार्टी एनडीए के गठबंधन से अलग होने की घोषणा करती है !
— HANUMAN BENIWAL (@hanumanbeniwal) December 26, 2020
केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनास आता जवळपास महिना झाला आहे. दरम्यान या शेतकरी आंदोलनास पाठिंबा देत आणखी एका मित्र पक्षाने एनडीएची साथ सोडली आहे. राष्ट्रीय लोकतांत्रिक पार्टी(आरएलपी)ने आज एनडीएमधून बाहेर पडत असल्याची घोषणा केली आहे. तर, कृषी कायद्याचा विरोध करण्यासाठी या अगोदर अकाली दलने देखील भाजपाची साथ सोडलेली आहे. या आधी शिवसेना , अकाली दल आणि आता आरएलपीने भाजपचा हात सोडला आहे.
I have left the NDA (National Democratic Alliance) in protest against the three farm laws. These laws are anti-farmer. I have left NDA but won't forge alliance with Congress: Rashtriya Loktantrik Party chief Hanuman Beniwal pic.twitter.com/luToWGTwa7
— ANI (@ANI) December 26, 2020
राष्ट्रीय लोकतांत्रिक पार्टी(आरएलपी)चे अध्यक्ष खासदार हनुमान बेनीवाल यांनी भारत सरकरारद्वरे आणल्या गेलेल्या कृषी विरोधी कायद्यांमुळे आज राष्ट्रीय लोकतांत्रिक पार्टी(आरएलपी) एनडीए आघाडीतून वेगळं होत असल्याची घोषणा करीत असल्याचे जाहीर केले आहे. दरम्यान हि घोषणा करण्याआधीच खासदार हनुमान बेनीवाल यांनी तीन संसदीय समित्यांचा राजीनामा लोकसभा अध्यक्षांना पाठवला होता. तसेच, या अगोदर घोषणा केल्याप्रमाणे आंदोलक शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी हनुमान बेनीवाल हे आता जयपूर, जोधपूर, कोटपुतली, अलवर, नागौर, जैसलमेरसह राजस्थानमधील अनेक जिल्ह्यांमधील शेकडो शेतकऱ्यांना घेऊन हरियाणा बॉर्डरच्या शाहजहांपूरकडे निघाले आहेत.