AurangabadCrimeUpdate : पाठलाग करून कत्तलीसाठी जाणारी जनावरे पकडली, क्रांतीचौक पोलिसांची कारवाई

औरंंंगाबाद : कत्तलीसाठी जनावरे घेवून जाणारे पीकअप वाहन क्रांतीचौक पोलिसांनी शुक्रवारी (दि.२५) पहाटे पाठलाग करून पकडले. पोलिसांनी तीन गायी व दोन गो-हे असे एकूण ५ जनावरे जप्त करून बेगमपुरा येथील गुरू गणेश गोशाळेत ठेवली आहेत.
क्रांतीचौक पोलिस ठाण्याच्या उपनिरीक्षक अनिता बागूल या गुरूवारी रात्री रात्रपाळी ड्युटीवर होत्या. गोवंशीय जनावरांची कत्तलीसाठी वाहतूक होत असल्याची माहिती बागूल यांना मिळाली होती. पोलिस निरीक्षक डॉ.जी.एच.दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अनिता बागूल, गायकवाड, सहाय्यक फौजदार गायकवाड, पोलिस अंमलदार बोंगाणे, देशमुख आदींच्या पथकाने क्रांतीचौकापासून पाठलाग करून सिल्लेखाना चौकात पिकअप वाहन क्रमांक (एमएच-२०-ईजी-३७१०) अडविले. पोलिसांना पाहताच पिकअप चालक व किन्नरने वाहन सोडून धुम ठोकली. पोलिसांनी वाहनाची पाहणी केली असता त्यामध्ये तीन गायी व दोन गो-हे अशी एवूâण पाच गोवंशीय जनावरे मिळून आली. याप्रकरणी क्रांतीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास उपनिरीक्षक अनिता बागूल करीत आहेत.