MumbaiNewsUpdate : पोलीस जमादाराची गोळी झाडून आत्महत्या

मुंबई पोलीस दलातील पोलीसजमादाराने सकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास ड्युटीवर असताना पोलीस स्टेशनमध्ये गोळी झाडून आत्महत्या केली असल्याचे धक्कादायक वृत्त आहे. सखाराम भोये असं आत्महत्या केलेल्या पोलीस हेड कॉन्स्टेबलचं नाव आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. त्यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.
याविषयी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, नालासोपारा पूर्वेकडील तुळींज पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले सखाराम भोये या पोलिस कर्मचाऱ्यानं ड्युटीवर असताना आत्यांच्या सहकाऱ्यांनी गोळीचा आवाज ऐकलं तेंव्हा सखाराम भोये हे रक्ताच्या थारोळ्यात मृत अवस्थेत आढळून आले. पोलीस कर्मचाऱ्यानं एवढे टोकाचं पाऊल का उचललं असावा, याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळाली नाही. या प्रकरणी पोलीस तपास करत आहेत. गेल्या चार वर्षांपासून ते या पोलीस ठाण्यात कार्यरत होते.
या प्रकरणी तुळींज पोलीस स्टेशनमध्ये नोंद करण्यात आली आहे. सखाराम भोये यांच्या नातेवाईकांचीही चौकशी केली जाऊ शकते, असं पोलीसांनी सांगितलं आहे. सखाराम भोये यांच्या कुटुंबात काही वाद सुरू आहेत का? त्यांच्या पत्नी भांडण झालं होतं का? या बाजूने देखील पोलीस तपास करत आहे,. नेमके कोणत्या संकटात होते की त्यांनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं, अशी चर्चा सध्या सुरू आहे.