MaharashtraCoronaUpdate : राज्यात ४६१० रुग्णांना डिस्चार्ज , ९४९ नवे रुग्ण तर ६० मृत्यूंची नोंद

गेल्या २४ तासात महाराष्ट्रात ४ हजार ६१० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण १७ लाख ६१ हजार ६१५ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३.५४ टक्के इतके झाले आहे. आज राज्यात २ हजार ९४९ नवे रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर राज्यात आज ६० मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यू दर हा २.५६ टक्के एवढा झाला आहे. शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.
राज्यात आज 2949 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 4610 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 1761615 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 72383 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 93.54% झाले आहे.#CoronaVirusUpdates
— Rajesh Tope (@rajeshtope11) December 14, 2020
सध्या राज्यात ५ लाख ४ हजार ४०६ व्यक्ती होम क्वारंटाईन आहेत. तर ४ हजार ३३५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. राज्यात आज घडीला ७३ हजार ३८३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आज राज्यात २ हजार ९४९ रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या १८ लाख ८३ हजार ३६५ इतकी झाली आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी १७ लाख ४८ हजार ३६२ चाचण्यांपैकी १८ लाख ८३ हजार ३६५ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
आज नोंद झालेल्या ६० मृत्यूंपैकी २७ मृत्यू हे मागील ४८ तासांमधले आहेत. तर ८ मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित २५ मृत्यू हे एक आठवड्यापूर्वी पेक्षा जास्त कालावधीतले आहेत. हे २५ मृत्यू नाशिक-११, अमरावती-६, पुणे-३, परभणी-२, नांदेड-२, नागपूर-१ असे आहेत. महाराष्ट्र सरकारच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.
Maharashtra reports 2,949 new #COVID19 cases, 4,610 discharges, and 60 deaths today, as per State Health Department
Total cases 18,83,365
Total recoveries 17,61,615
Death toll 48,269
Active cases 72,383 pic.twitter.com/qvycEdDf9R— ANI (@ANI) December 14, 2020