…या चुकीमुळे दारू पार्टीत झाला स्फोट

मध्यप्रदेशमधील मुरैना जिल्ह्यात थंडीमध्ये एकत्र दारू पार्टी करणे तीन मित्रांना चांगलेच महागात पडल्याची घटना घडली आहे. दारू पार्टी करत असताना एका चुकीमुळे दारूच्या बाटलीचा अचानक स्फोट झाला आणि तिन्ही मित्र चांगलेच भाजले.
मध्यप्रदेशमधील मुरैना जिल्ह्यातील जनकपूर गावात ही घटना घडली असल्याचे वृत्त आहे. रविवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास लायक सिंह (वय 65), हथियार सिंह (वय 70) आणि ब्रजमोहन सिंह (वय 30) हे तिघेही जण दारू पिण्यासाठी एकत्र बसले होते. थंडीचे दिवस असल्यामुळे तिघांनी पुरेशी दारू, सिगारेट आणले होते.एक एक प्याले रिचवत तिघांची जोरदार पार्टी सुरू होती.मध्येच तिघेही जण सिगारेट सुद्धा ओढत होते. सिगारेट ओढत असताना जळालेला तंबाखूचा भाग जमिनीवर झटकण्याचा प्रयत्न केला असता तो जमिनीवर न पडता सिगारेटचा गरम तुकडा थेट दारूच्या बाटलीत पडला आणि स्फोट झाल. दरम्यान तिघेे दारूच्या नशेत असल्यामुळे नेमके काय घडले, हे कुणालाच काही कळले नाही.
आगीच्या भडक्यामुळे लायक सिंह, हथियार सिंह आणि ब्रजमोहन सिंह यांचे चेहरे, हात आणि छाती भाजून गेली होती. त्यामुळे तिघांची दारू एका झटक्यात उतरली. तिघांनी अक्षरश: जमिनीवर लोळून आग विझवली होती. अचानक स्फोटाचा आवाज आल्यामुळे शेजाऱ्यांनी जाऊन पाहिले असता तिघेही भाजलेल्या अवस्थेत आढळून आहे. त्यानंतर तिघांनाही शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिघांवरही उपचार सुरू आहे.