MaharashtraCoronaUpdate : राज्यात ३७१७ नवे रुग्ण , ३०८३ रुग्णांना डिस्चार्ज , ७० रुग्णांचा मृत्यू

राज्यात आज 3717 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 3083 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 1757005 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 74104 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 93.44% झाले आहे.#CoronaVirusUpdates
— Rajesh Tope (@rajeshtope11) December 13, 2020
राज्यात कोरोनामुक्त होणाऱ्यांमध्ये रविवारी थोडी घट बघायला मिळाली. तर दिवसभरात 3 हजार 83 रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे कोरोनामुक्त होणाऱ्यांचं प्रमाण 93.44 टक्के एवढं असून एकूण संख्या ही 17 लाख 57 हजार एवढी झाली आहे. गेल्या 24 तासांमध्ये 3 हजार 717 नवे रुग्ण आढळून आलेत. त्यामुळे राज्यातल्या एकूण रुग्णांची संख्या ही 18 लाख 80 हजार 416 एवढी झाली आहे. दिवसभरात 70 रुग्णांचा मृत्यू झाला. मृत्यू दर हा 2.56 वर गेला आहे.
राज्यात आजपर्यंत 1 कोटी 17 लाख 2 हजार 457 एवढ्या चाचण्या घेण्यात आल्या असून 16.07 टक्के जणांचे निकाल हे पॉझेटिव्ह आले आहेत. राज्यातल्या उपचाराधिन रुग्णांची संख्या घटली असून सध्या 74 हजार 104 जणांवर उपचार सुरू आहेत.