IndiaNewsUpdate : “त्या ” पत्रावरून शरद पवार यांचा खुलासा भाजप नेत्यांना दिला “हा ” सल्ला

एकीकडे कृषी कायद्यावरून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. तर दुसरीकडे भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असा वाद पेटला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना २०१० च्या कथित पत्राबद्दल सवाल विचारला असता त्यांनी यावर खुलासा केला आहे. परंतु, पत्रकारांनी वारंवार एकच प्रश्न रेटून धरल्यामुळे शरद पवार चांगले भडकल्याचे पाहण्यास मिळाले. भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस माझं पत्र वाचून दाखवत आहे, पण त्यांनी आधी ते नीट वाचावे, असा सल्ला देत सणसणीत टोला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी लगावला आहे. शरद पवार हे नवी दिल्लीच्या दौऱ्यावर आहेत . कृषी कायदा आणि शेतकऱ्यांच्या आंदोलनावर उद्या बुधवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची ५.३० वाजता भेट घेणार आहे.
दरम्यान शरद पवार यांनी दिल्ली संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांची भेट घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलत असताना त्यांनी पुरंदर विमानतळाबाबत ही भेट घेतल्याचे सांगितले. यावेळी आपण शेतकरी आंदोलनावर बोलणार नाही, असं पवारांनी स्पष्ट केले. भाजप नेत्यांनी २०१० चे तुमचे पत्र दाखवून आरोप केला आहे, असे पत्रकारांनी विचारले असताना पवार म्हणाले की, ‘मी पत्र लिहिले होते ते खरं आहे. पण, माझ्या पत्राचा जी लोकं उल्लेख करीत आहे. त्यांनी माझे पत्र नीट वाचावे. मी माझ्या पत्रात एपीएमसी मार्केटबद्दल सुधारणा केली पाहिजे, असं बोललो आहे. पण आज मोदी सरकारने जे कृषी कायदे केले आहे. त्यामध्ये एपीएमसी मार्केटचा उल्लेखच नाही. त्यामुळे आमचे नाव घेऊन आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे’, अशी टीका पवार यांनी केली.
का भडकले शरद पवार
दरम्यान एक पत्रकार २०१० च्या पत्राचा वारंवार उल्लेख करत पवारांना प्रश्न विचारता होता, त्यामुळे शरद पवार चांगलेच संतापले. ‘तुम्ही लोकं बाहेर उभे होते, ते पाहून मला बरं वाटलं नाही म्हणून मी तुम्हाला इथं बोलावलं. पण, उत्तर देऊनही तुम्ही एकच प्रश्न विचारून माझा वेळ वाया घालवत आहात. मी तुम्हाला इथं बोलावून चुकी केली आहे, यापुढे तुम्हाला बोलावणार नाही’ असं म्हणत शरद पवार यांनी पत्रकारांना उत्तर न देता निघून गेले. आपल्या पत्राबद्दल अधिक खुलासा करताना पवार म्हणाले कि , मी माझ्या पत्रात एपीएमसी मार्केटबद्दल सुधारणा केली पाहिजे, असं बोललो आहे. पण आज मोदी सरकारने जे कृषी कायदे केले आहे. त्यामध्ये एपीएमसी मार्केटचा उल्लेखच नाही. त्यामुळे आमचे नाव घेऊन आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे’, अशी टीका पवार यांनी केली.
काय म्हणाले होते फडणवीस ?
‘शरद पवार यांनी 2010 मध्ये अनेक पत्र लिहून कृषी सुधारणा सुचवल्या होत्या. शरद पवार यांच्या आत्मचरित्रातही याचा उल्लेख आहे. अधिक व्यापक चर्चा व्हायला हवी, असं पवार म्हणाले आहेत. त्यामुळे शरद पवार यांची आताची भूमिका ही दुटप्पीपणाची आहे. डीएमकेनं 2016 साली असंच काही आश्वासन दिलं होतं. आप ने हे कायदे मंजूर केले आहे. अकाली दल 12 डिसेंबर 2012 रोजी एपीएमसी दलालांचे अड्डे बनले आहेत असं म्हटले होते. त्यामुळे मोदी सरकारविरोधातील या आंदोलनाला पाठिंबा म्हणजे, वाहत्या गंगेत हात धुवून घेण्याचा प्रकार आहे, अशी टीका फडणवीस यांनी केली होती.